Tarun Bharat

उत्सवी काळात ग्राहक अधिक करणार खर्च

Advertisements

डेलॉय संस्थेच्या अहवालात माहिती

वृत्तसंस्था / कोलकाता

कोरोनासंबंधित सर्व निर्बंध उठवले गेल्यामुळे येणाऱया उत्सवी काळामध्ये भारतीय ग्राहक जास्तीत जास्त खर्च करण्यासाठी पुढे येतील असा विश्वास डेलॉय या संस्थेने नुकताच व्यक्त केला आहे.

पर्यटनासाठी बाहेर पडणारे व हॉटेलमध्ये राहणारे आगामी काळात जास्तीत जास्त खर्च करतील असेही अहवालात म्हटले आहे. पुढील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ग्राहक एक नवीन वाहन किंवा सेकंडहॅन्ड वाहन खरेदी करू शकतात. याचाच अर्थ उत्सवात वाहनांच्या खरेदीत वाढ होण्याची शक्मयता डेलॉय यांनी व्यक्त केली आहे.

कपडय़ांसह इलेक्ट्रॉनिक वस्तु

उत्सवी हंगाम सुरु झाल्याने या काळात कपडय़ांसह इलेक्ट्रॉनिक वस्तुंची खरेदी मोठय़ा प्रमाणावर होणार असल्याची माहिती आहे. तसेच मनोरंजन, रेस्टॉरंट आणि विमान प्रवासावरही आगामी काळामध्ये खर्च अधिक पेलेला दिसणार आहे. यामध्ये 13 टक्के ग्राहक हे कपडे, 10 टक्के ग्राहक इलेक्ट्रॉनिक वस्तू व घराच्या सजावटीच्या सामानाची खरेदी करताना दिसतील. मनोरंजन आणि विमान प्रवासावर खर्च करणाऱयांचे प्रमाण 13 टक्के असणार आहे.

Related Stories

इपीएफओची मल्टी लोकेशन क्लेम सुविधा

Patil_p

स्टील स्ट्रिप्स व्हील्सला 11.25 कोटींची ऑर्डर

Patil_p

टेक महिंद्राकडून 600 जणांची भरती

Patil_p

ऑगस्टमध्ये निर्यात 45 टक्के वाढली

Amit Kulkarni

आयसीआयसीआय बँकेची विशेष मुदत ठेव योजना

Patil_p

कृषिपरिवर्तनाची नांदी

Omkar B
error: Content is protected !!