निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेतला
प्रतिनिधी /मडगाव
आम आदमी पक्षाच्या दक्षिण गोवा युनिटने नावेली-मडगाव येथे चिंतन बैठक घेतली. या बैठकीत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.
महादेव नाईक, (महाराष्ट्र प्रभारी), वरि÷ नेते ऍड. अमित पालेकर आणि सरचिटणीस जर्सन गोम्स यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला पक्षाचे आमदार इंजिनियर प्रुझ सिल्वा आणि कॅप्टन व्हेंझी व्हिएगस यांच्यासह दक्षिण गोव्यातून विधानसभा निवडणूक लढवलेल्या सर्व ‘आप’च्या उमेदवारांची उपस्थिती होती.
विविध उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातील पक्षाच्या कामगिरीबाबत सविस्तर अभिप्राय दिला. तसेच पुढील वाटचालीसाठी सूचनाही केल्या. चिंतन बैठक दरम्यान, आप नेत्यांनी निवडणूक प्रचाराबाबत तसेच गोव्यातील पक्ष मजबूत करण्यासाठी पुढील वाटचालीबाबत सविस्तर चर्चा केली.
पक्षाची पुनर्रचना करून आक्रमक सदस्यत्व मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी पंचायत निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीवरही बैठकीत चर्चा झाली.