Tarun Bharat

निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम उत्सहात

प्रतिनिधी /बेळगाव

आयएमए बेळगाव शाखेच्यावतीने सीएमई म्हणजेच निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम हॉटेल संकम येथे नुकताच पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व वर्ल्ड मेडीकल असोसिएशनचे खजिनदार डॉ. रवी वानखेडकर व राष्ट्रीय महिला डॉ. मीना वानखेडकर उपस्थित होते.

यावेळी डॉ. जी. एस. कुलकर्णी आणि डॉ. रिचर्ड सालढाणा तर उद्घाटक म्हणून कर्नाटक आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुरेश कुडावा उपस्थित होते. यावेळी डॉ. जी. एस. कुलकर्णी यांनी डॉक्टरांचे आरोग्य आणि आयुर्मान याबद्दल मार्गदर्शन केले. तर डॉ. सालढाणा यांनी बेळगावमधील वैद्यकीय तंत्रज्ञान जागतिक दर्जाशी स्पर्धा करत असून अवयव रोपणामध्ये बेळगाव पुढे येत असल्याचे स्पष्ट केले.

डॉ. सुरेश यांनी डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी आयएमएतर्फे घेतल्या गेलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. डॉ. वानखेडकर यांनी एनएमसीचा वैद्यकीय पेशावर  झालेला परिणाम आणि सुचविलेले बदल याची माहिती दिली. याच कार्यक्रम मुंबईचे डॉ. नितीन पाटणकर, पुण्याचे डॉ. आशिष बहुलकर, बेंगळूरचे डॉ. सुनील शेणवी, हुबळीचे डॉ. जी. बी. सत्तूर, डॉ. एम. बी. बेल्लेद, डॉ. आरती दर्शन, डॉ. सौम्य वेर्णेकर, डॉ. संतोष यांनी सीएमईमध्ये आपले विचार व्यक्त केले. या शिवाय बेसीक लाईफ सपोर्ट इन्शुलीन यावरही चर्चासत्र झाले.

150 हून अधिक जणांनी सीएमईचा लाभ घेतला. यासाठी चेअरपर्सन डॉ. नीता देशपांडे, आयएमए अध्यक्ष डॉ. राजश्री अनगोळ, सचिव डॉ. संतोष शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

म. ए. समिती महिला आघाडीतर्फे होमिओपॅथिक गोळय़ांचे वितरण

Patil_p

लोकसेवा फौंडेशनतर्फे असोगा येथे बेल रोपांची लागवड

Amit Kulkarni

दुसऱया टप्प्यातील टॅगिंगला सुरुवात

Patil_p

उमेदवारांवर टीकात्मक वृत्त प्रसिद्ध केल्यास कारवाई

Amit Kulkarni

पंतप्रधानांच्या आवाहनाला शहरवासियांचा प्रतिसाद

Patil_p

आराधना शाळेत कनकदास जयंती

Patil_p