मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : पणजीत राष्ट्रीय सहकार सप्ताहाचा समारोप कार्यक्रम
प्रतिनिधी /पणजी
गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी सहकार क्षेत्राने महत्त्वाचे योगदान देण्याची गरज असून सहकार खात्यातील अधिकारी वर्गाने त्या दिशेने काम करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. वज्यातील सहकार सोसायटींनी प्रामाणिकपणे काम केल्यास स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न साकार होईल, असेही ते म्हणाले.
पणजीत झालेल्या राष्ट्रीय सहकार सप्ताहाच्या समारोपाच्या कार्यक्रमात डॉ. सावंत बोलत होते. पाटो ा पणजी येथील सहकार संकुलात हा कार्यक्रम झाला. सहकारमंत्री सुभाष शिरोडकर हे त्यावेळी अध्यक्ष या नात्याने उपस्थित होते तर सहकार खाते सचिव एम. आर. एम. वव हे सन्माननीय अतिथी म्हणून हजर होते. प्रमुख पाहुणे डॉ. सावंत पुढे म्हणाले की, गोमंतकीयांनी सरकारी ा ई – मार्केट प्लेस या पोर्टलवर नोंदणी करावी. त्यामुळे उत्पादने देशभर पोहोचतील. त्या पोर्टलवरुन सदर उत्पादने अखिल भारतीय स्तरावरील मार्केटमधील पातळीवर जातील. कुशल प्रशिक्षण आणि डिजिटायझेशनवर भर देण्याची गरज असून सरकारतर्फे त्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
अनेक सोसायटय़ा बुडीत खात्यात जमा होतात कारण तिथे प्रामाणिकपणे कामे होत नाहीत. सोसायटीतून सहकाराचा उद्धार होईल. सहकार क्षेत्र, सहकार खाते व सोसायटय़ा यांनी निष्ठेने काम केले तर गोवा स्वयंपूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. सहकारी बँकांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे, असेही डॉ. सावंत यांनी नमूद केले. सहकार खात्याचे सचिव राव यांचेही त्यावेळी भाषण झाले. त्याशिवाय सहकार क्षेत्रातील नामवंत विठ्ठल वेर्णेकर यांनी प्रमुख भाषण केले.
सहकारी बँकांनी नाबार्डकडून अडीच टक्के दराने कर्ज घेऊन ते शेतकरी वर्गाला 4 टक्के दराने द्यावे. त्यामुळे शेतकऱयांना लाभ होईल व सहकार क्षेत्रात ते काहीतरी करु शकतील, अशी सूचना शिरोडकर यांनी केली. सहकार खाते, गोवा राज्य सहकार युनियन, राष्ट्रीय सहकार युनियन यांच्या सहकार्याने हा सप्ताह आखण्यात आला होता.