Tarun Bharat

बीबीसीच्या बोधपटावरून वाद कायम

हैदराबाद विद्यापीठात झाले स्क्रीनिंग ः केरळमध्ये दाखविण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 2002 मधील गुजरात दंगलीसंबंधी बीबीसीने एक बोधपट जारी केला असून त्यावरून निर्माण झालेला वाद वाढतच चालला आहे. भारतापासून ब्रिटनपर्यंत या बोधपटासाठी बीबीसीला टीका सहन करावी लागत आहे. तर बीबीसीच्या बोधपटाबद्दल अधिक माहिती नसल्याचे अमेरिकेने म्हटल आहे.

बीबीसीने अलिकडेच ‘इंडिया ः द मोदी क्वेश्चन’ नावाने दोन भागाती एक सीरिज प्रदर्शित केली आहे. ही सीरिज गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलीच्या विविध पैलूंची पडताळणी करणारी असल्याचा दावा बीबीसीने केला आहे. गुजरात दंगलीदरम्यान नरेंद्र मोदी हे राज्याचे मुख्यमंत्री होते.  बोधपट इंटरनेटवर प्रसारि होताच तृणमूल खासदार महुआ मोइत्रा आणि डेरेक ओ ब्रायन यांनी केंद्रावर निशाणा साधत या बोधपटाची ‘लिंक’ ट्विटरवर शेअर केली होती, त्यानंतर ट्विटरने त्यांचे ट्विट हटविले होते.

केंद्र सरकारच्या तीव्र आक्षेपानंतरही केरळमधील सत्तारुढ माकपची विद्यार्थी शाखा डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाने हा बोधपट राज्यात दाखविला जाणार असल्याचे म्हटले आहे. तर हैदराबाद विद्यापीठ परिसरातही वादग्रस्त बोधपट दाखविला गेला आहे. याप्रकरणी अभाविपने पोलिसांकडे तक्रार नेंदविली आहे. केंद्र सरकारच्या बंदीच्या आदेशाच्या दुसऱया दिवशी विद्यार्थ्यांनी हा बोधपट दाखविला असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

दिल्लीतील जेएनयू परिसरातही स्क्रीनिंगच्या कार्यक्रमावरून पत्रके वाटण्यात आली होती. विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष आइशी घोषने वादग्रस्त बोधपटाचे पोस्टर शेअर केले आहे. आइशीची पोस्ट व्हायरल होताच जेएनयू प्रशासनाने दिशानिर्देश जारी केले, त्यानंतर तेथील स्क्रीनिंग रद्द करण्यात आले आहे.

ब्रिटनमध्येही वाद

बीबीसीच्या बोधपटावरून ब्रिटनमध्येही वाद निर्माण झाला आहे. तेथे एक ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली असून यात पंतप्रधान मोदींवरील वादग्रस्त बोधपट सीरिजप्रकरणी बीबीसीकडून करण्यात आलेल्या कर्तव्यांच्या गंभीर उल्लंघनाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी आहे. ब्रिटनमध्ये प्रसारमाध्यमंवर देखरेख ठेवणारी संस्था ‘द ऑफिस ऑफ कम्युनिकेशन्स’कडे बीबीसीला उत्तरदायी करण्याची मागणी करण्यात आली आहे. कंटेंट मापदंडांचे पालन करण्यास बीबीसी अनेकदा अपयशी ठरले आहे. याचमुळे प्रसारकासोबत आवश्यक सुधारणा आणि स्पष्टीकरणावरून आवश्यक चर्चा करण्यात यावी असे याचिकेत म्हटले गेले आहे.

हिंदू फोरमकडून बीबीसीला पत्र

हिंदू फोरम ऑफ ब्रिटनने देखील बीबीसीला पत्र लिहिले आहे. बीबीसीच्या ‘हिंदूविरोधी पूर्वग्रहा’ने आम्ही निराश आहोत. ‘इंडिया ः द मोदी क्वेश्चन’च्या कंटेंटमध्ये निष्पक्ष वृत्तांकनाचे मूल्य गायब आहे. मोठय़ा संख्येत हिंदू धर्मीयांनी आमच्याशी संपर्क साधत बीबीसीने बोधपट दाखविताना असंवेदनशीलता दर्शविल्याचे सांगितले आहे. या बोधपटामुळे दोन समुदायांदरम्यान तणाव निर्माण होऊ शकतो असे हिंदू फोरम ऑफ ब्रिटनने बीबीसी न्यूजचे सीईओ डेबोरा टर्नस यांना लिहिलेल्या पत्रात नमूद पेले आहे.

भारतात प्रसारणावर बंदी

केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर आणि युटय़ूबला बोधपटाचे लिंक ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. बोधपटात निष्पक्षतेचा अभाव आहे, तसेच तो वसाहतवादी मानसिकता दर्शविणारा असल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे, तर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसा यासारख्या विरोधी पक्षांनी ट्विटर पोस्टला ब्लॉक करण्याच्या सरकारच्या निर्णयावर कठोर टीका केली आहे.

Related Stories

धक्कादायक : सर्वोच्च न्यायालयाच्या गेटवर दोन जणांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

Tousif Mujawar

कोरोना : पाटणामध्ये आणखी 7 दिवस लॉक डाऊन

Tousif Mujawar

Urmila Matondkar : उर्मिला मातोंडकर भारत जोडो यात्रेत सहभागी; राहुल गांधींसोबत जम्मूमधून पदक्रमण

Abhijeet Khandekar

कोरोना स्थितीवर चर्चेसाठी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक

Patil_p

स्वयंघोषित गुरु नित्यानंद विरोधात इंटरपोलकडून नोटीस जारी

prashant_c

केरळच्या राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Amit Kulkarni