आधीच सदर बसथांबा कोसळण्याच्या स्थितीत आहे. मात्र अवजड वाहनचालकांना याची भीती वाटत नाही.
वडगाव येळ्ळूर क्रॉस रामदेव गल्ली कॉर्नर येथील या बस स्थानकाचे पार्किंग लॉटमध्ये रूपांतर झाले असून, या बसथांब्याची यापूर्वीच दुरावस्था झाली आहे. आता वाहनांच्या पार्किंगमुळे प्रवाशांना उन्हातच बसची वाट पाहत ताटकळत थांबावे लागत आहे.