Tarun Bharat

हरियाणाकडे कुचबिहार करंडक

वृत्तसंस्था /मुंबई

कोलकाता येथील इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या कुचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद हरियाणाने पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात हरियाणाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईचा पराभव करत कुचबिहार करंडकावर आपले नाव कोरले.

हा अंतिम सामना अनिर्णित अवस्थेत संपला. हरियाणाने पहिल्या डावात 437 धावा जमविल्यानंतर मुंबईने पहिल्या डावात 303 धावा जमविल्याने हरियाणाने मुंबईवर पहिल्या डावात 104 धावांची आघाडी मिळविली होती. या सामन्यातील खेळाच्या शेवटच्या दिवशी हरियाणाने दुसऱया डावात 5 बाद 211 धावा जमविल्या. हरियाणाच्या दिनेश बाणाने 83 चेंडूत 12 चौकारांसह नाबाद 62 धावा जमविताना सर्वेश रोहिलासमवेत 6 व्या गडय़ासाठी अभेद्य 95 धावांची भागिदारी केली. या संपूर्ण स्पर्धेत  फलंदाजीत 670 धावा आणि गोलंदाजीत 32 गडी बाद करणाऱया हरियाणाचा कर्णधार मुशिर खानला ‘मालिकावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक- हरियाणा प. डाव 437, दु. डाव 5 बाद 211 (दिनेश बाणा नाबाद 62, शंडिल्य 31, शेडगे 3-86), मुंबई प. डाव सर्वबाद 303.

Related Stories

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार रकमेत भरीव वाढ?

Patil_p

पॅराबॅडमिंटनमध्ये भारताचा डबल धमाका, प्रमोद भगतची सुवर्णपदकाला गवसणी

Archana Banage

डायमंड लीगमध्ये अविनाश साबळेला पाचवे स्थान

Patil_p

भारतीय महिला क्रिकेट संघाचा पराभव

Patil_p

ऍटलांटा स्पर्धेत जॉन इस्नेर विजेता

Patil_p

41 संभाव्य फुटबॉलपटूंची घोषणा

Patil_p