रत्नागिरी प्रतिनिधी
लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटीव्ह सोसायटी आयोजित पाककर्ला स्पर्धेत संध्या महेश नाईक विजेत्या ठरल्या. त्यांनी बनवलेल्या ‘पोष्टीक अप्पे’ या पदार्थाला प्रथम क्रमांक मिळाला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटीव्ह सोसायटी’तर्फे 4 मार्च 2023 रोजी शहरातील शिवाजीनगर येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात दुपारी 3 ते 6 यावेळेत ‘उन्नती’ पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. स्पर्धेचा हॉल महिलांच्या गर्दीने पूर्णपणे भरून गेला होता.
पाककला स्पर्धेच्या द्वितीय क्रमांक प्रेरणा स्वप्नील देसाई यांनी पटकावला त्यांनी नाचणीचा केक बनवला होता तर मेघना अनिकेत वालम यांनी तृतीय क्रमांक पटकावला त्यांनी मल्टीग्रीन थालीपीठ बनवले होते. उत्तेजनार्थ सई र्कोतेय खेडेकर व नुपूर निनाद पारुते यांना गौरवण्यात आले.
जागतिक आरोग्य संघटनेने हे वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यानिमित्ताने या स्पर्धेमध्ये कोणतेही तृणधान्य वापरून तो पदार्थ घरून करून आणायचा होता. तयार केलेला पदार्थ गोड किंवा तिखट कोणत्याही स्वरूपातील असेल परंतु त्यातील मुख्य घटक तृणधान्य असावे, असे स्पर्धेचे स्वरूप होते. शेकडो महिलांनी स्पर्धेसाठी आपल्या घरून पदार्थ बनवून आणले होते.
सर्व प्रथम महिलांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत महिलांनी घरुन बनवून आणलेल्या पदार्थांचे सादरीकरण केले. यानंतर उपस्थित महिलांसाठी फनीगेम्सचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी पाककलास्पर्धेच्या परीक्षक कोमल तावडे, दिप्ती भिडे, फनी गेम परीक्षक नंदिनी देसाई यांच्यासह पमुख अतिथी डॉ. तोरल शिंदे, सेलेब्रेटी गेस्टी लक्ष्मी ढेकणे, व उर्मिला घोसाळकर या कार्यकमाचे पायोजक पुरूषोत्तम नारायण गाडगीळ च्या पतिनिधी सुर्वे यांचे लोकमान्यच्या रिजनल मार्केटिंग मॅनेजर सारिका कुलकर्णी यानी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी परीक्षक नंदिनी देसाई, दिप्ती भिडे, कोमल तावडे यांनी मनोगत व्यक्त केले.
फनीगेम्स स्पर्धेत एका काडीत मेणबत्या पेटवणे स्पर्धेत नीलम माळवदे, स्ट्रॉने वटाणे जमवणे स्पर्धेत संगीत नारकर, स्वतःची ओळख नुपुर पास्ते, जास्तीत जास्त बिस्कीट खाणे स्पर्धेत शोभा पाटील, उखाणा स्पर्धेत सुनेत्रा पेडणेकर व आर्थिक सक्षमता प्रश्नमंजुषा स्पर्धेत श्रृती बापट यांनी प्रथम क्रमांक पटकावला. नम्रता नितीन गवळी यां लकी ड्रॉ स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या. या संपूर्ण कार्यकमाचे निवेदन दिप्ती कानविंदे यांनी केले. कार्यक्रमाला लोकमान्य मल्टीपर्पज को ऑपरेटीव्ह सोसायटीचे सर्व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.