प्रतिनिधी/ बेळगाव
इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव यांच्या ‘शुक्रीया’ या उपक्रमांतर्गत रविवारपेठ परिसरात कुली व हमाली काम करणाऱया 20 कामगारांचा सत्कार करण्यात आला. या सर्व कामगारांची मोफत दंत व नेत्र तपासणी करण्यात आली.
कामगारांच्या जीवनात एखादा आनंदाचा दिवस यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता. यानिमित्त कामगारांसाठी खेळ आयोजित केले होते. विजेत्यांना स्टीलचा टिफीन बॉक्स देण्यात आला. फराळ व मास्क वाटून कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमाचे रविवारपेठ येथील व्यापारी व दुकानदारांनी कौतुक केले.