Tarun Bharat

यल्लम्मा यात्रेतील सुविधांसाठी सहकार्य करा

यल्लम्मा देवस्थानचे कार्यनिर्वाहक अधिकारी बसवराज जिरग्याळ यांचे बैठकीत आवाहन

वार्ताहर /बैलहोंगल

येत्या 7  डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेदरम्यान लाखो भाविक यल्लम्मा डोंगरावर उपस्थित राहणार आहेत. त्यादरम्याने भाविकांना पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य. यासह सर्व सुविधा पुरवण्यासाठी सर्व खात्याच्या विभागा अधिकाऱयांनी सहकार्य करावे अशी विनंती यल्लम्मा मंदिराचे कार्यनिर्वाहक अधिकारी बसवराज जिरग्याळ यांनी केली. ते गुरूवारी सौंदत्ती यल्लम्मा ंमंदिराच्या सभा भवनात यात्रेच्या पूर्वतयारी संदर्भात बोलाविलेल्या बैठकीत बोलत होते.

 7 व 8 डिसेबंर रोजी कंकण मंगळसूत्र विसर्जनचा व धार्मिक विधी पार पडणार आहे. यात्रेसाठी महाराष्ट्र गोवा व इतर राज्यातून भाविक येणार आहेत. या दरम्यान जमदग्नी ंमंदिराजवळ आणि दाट लोकवस्तीच्या ठिकांणी आरोग्य तपासणी शिबिराची आवश्यकता आहे. भाविकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी   ठिकठिकांणी सीसीकॅमेरे बसविण्यात येणार आहेत. महसूल विभागाचे कर्मचारी मोठय़ा प्रमाणात तैनात करून सहकार्य करावे. दर्शनाच्या रांगाची चोख व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच मद्य, मांस, गुटका विक्री होत असल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था

 एकेरी वाहतुकीसह कायदा व सुव्यवस्था चोख पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यात्रेकरुंची गैरसोय होऊ नये यासाठी भाविकांना †िपण्याच्या पाण्याची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती त्यानी दिली. कोरोनानंतर यंदा पहिल्यांदाच डोंगरावर भाविकांची गर्दी होणार असल्याने   भाविकांना पाण्याची सर्व सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले.

 भाविकांच्या दृष्टीकोनातून बसची सोय, वसती निवास, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, फिरता दवाखाना, जनावरे तपासणी केंद्र, दर्शनाची सुलभ व्यवस्था, विद्युत दिव्यांची सोय व स्वच्छता आदी सुविधा पुरविल्या जाणार असल्याचे त्यानी सांगितले.

400 हून अधिक पोलीस तैनात

यात्राकाळात चोरीचे प्रकार घडत असतात. याकडे लक्ष देण्यासाठी 400 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहे. यंदा मंदिर व स्नानपुंड परिसरात नव्याने पन्नास सीसी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष बसाय्या हिरेमठ, अबकारी सीपीआय श्रीशैल अक्की, आरोग्य, परिवहन, महसूल, पोलीस तसेच विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. व्यवस्थापन समितीचे एच. ए. कदापूरकर, कांचना अमठ. अरविंद माळगी. अशोक मुरगोडसह देवस्थान प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

काडा कार्यालयासमोर गोंधळ सुरूच

Patil_p

विद्यार्थिनींना आता शेतकरी विद्यानिधी

Amit Kulkarni

कित्तूरचे तहसीलदार लोकायुक्तांच्या जाळय़ात

Amit Kulkarni

दुर्गामाता दौड मोठय़ा प्रमाणात साजरी करणार

Amit Kulkarni

कोल्हापूरात शिवरायांचे भव्य पोस्टर उभारून कर्नाटक सरकारचा निषेध

Abhijeet Khandekar

सावधान…महिलाच पळवितात दागिने !

Tousif Mujawar