Tarun Bharat

मतदारयाद्यांच्या दुरुस्तीसाठी सहकार्य करा

राजकीय पक्षांच्या बैठकीत एल. के. अतिक यांचे आवाहन

प्रतिनिधी/बेळगाव

बेळगाव जिह्यातील 18 विधानसभा मतदार संघातील मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये दोष आढळून आल्यास या संबंधी माहिती द्यावी. त्यामुळे मतदार याद्यांतील दोष दूर करुन त्या दुरुस्त करता येणार आहेत, असे आवाहन ग्रामीण विकास व पंचायत राज्य खात्याचे अप्पर मुख्य सचिव व मतदार याद्यांचे निरीक्षक एल. के. अतिक यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना केले.

मतदार याद्यांच्या दुरुस्ती संबंधी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हापंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी आदी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या मार्गसुचीनुसार मतदार याद्यांची पडताळणी करण्यात येत आहे. कच्ची मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. 8 डिसेंबर हे तक्रार दाखल करण्यासाठी शेवटची तारीख आहे. 1 जानेवारी 2023 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. जिल्हयातील सर्व कॉलेजमये यासंबंधी जागृती करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना करण्यात आले.

जिह्यातील 18 विधानसभा मतदार संघात 4 हजार 434 मतदान केंद्रे आहेत. शहरी भागात 3 हजार 355 व ग्रामीण भागात 1 हजार 179 मतदान केंद्रे आहेत. 9 नोव्हेंबर रोजी कच्ची यादी प्रसिध्द करण्यात आली असून 8 डिसेंबरपर्यंत दुरुस्ती करण्यात येणार आहे. कच्च्या यादीतील आकडेवारीनुसार 19 लाख 16 हजार 797 पुरूष, 18 लाख 71 हजार 348 महिला व 121 इतर असे एकूण 37 लाख 88 हजार 266 मतदार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

बुथ पातळीवर एजंटांची नियुक्ती करुन मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी आमदार पी. राजीव यांच्यासह विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 18 ते 19 वर्षातील नव मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यासाठी अभियान हाती घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

Related Stories

जितो लेडीज विंगतर्फे पाककृती स्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी बेळगावच्या चार बॉक्सर्सचे बळ्ळारीला प्रयाण

Amit Kulkarni

के. आर. शेट्टी किंग्स, विश्रुत स्ट्रायकर्स उपांत्य फेरीत

Amit Kulkarni

बडेकोळमठ यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ

Amit Kulkarni

जिल्हय़ातील 213 जणांचा अहवाल निगेटिव्ह

Patil_p

आयआयएफ बेळगाव शाखेच्या चेअरमनपदी आनंद देसाई

Amit Kulkarni