Tarun Bharat

सीमाभागात कायदा, सुव्यवस्थेसाठी समन्वय राखणार

निपाणीत आंतरराज्य पोलीस अधिकाऱयांची बैठक : आंतरराज्य हद्दीवर कर्नाटक, महाराष्ट्र पोलिसांतर्फे संयुक्त तपास नाके

प्रतिनिधी /निपाणी

गेली 66 वर्षे प्रलंबित असलेल्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अंतरिम याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तसेच बेळगावात होणाऱया हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सीमाभागात कोणताही गोंधळ होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी मंगळवारी दोन्ही राज्यातील वरि÷ पोलीस अधिकाऱयांची बैठक निपाणीत पार पडली. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती जिह्यांतील वरि÷ पोलीस अधिकारी प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन स्वरूपात हजर होते.

प्रारंभी सकाळी 9.30 वाजता बैठकीला सुरुवात झाली. सुमारे दीड तास झालेल्या या बैठकीत सीमाप्रश्नासंदर्भात दोन्ही राज्यांमधील नेत्यांकडून होणारी वक्तव्ये व त्याचे सीमाभागात उमटणारे पडसाद यावर चर्चा करण्यात आली. सीमाप्रश्नासंदर्भात जो निर्णय होईल, त्यानंतर दोन्ही राज्यांमधील सीमावर्ती भागात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, यासाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी समन्वय राखण्यावर एकमत झाले.

बैठकीनंतर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, गेल्या कांही दिवसांत सीमाप्रश्नासंदर्भात दोन्ही राज्यातील सीमावर्ती भागात अशांतता पसरली आहे. बस वाहतूक रोखण्याबरोबरच सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रयत्न झाला. यातील दोषींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. अशातच बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नासंदर्भात सुनावणी होणार आहे. सुनावणीदरम्यान कोणताही निर्णय झाला तरी सीमाभागात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, यासाठी पोलीस खाते सज्ज आहे. यासाठीच कर्नाटक व महाराष्ट्रातील सीमाभागात येणाऱया जिह्यांमध्ये पोलीस अधिकाऱयांची बैठक घेऊन यावर चर्चा केली.

कर्नाटकातून महाराष्ट्रात परिवहन विभागाच्या 490 बसेस दररोज जातात तर महाराष्ट्र परिवहनच्या 126 बसेस दररोज कर्नाटकात येतात. कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱया प्रवाशांची तसेच महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱया प्रवाशांची सुरक्षा करण्यासाठी दोन्ही राज्यातील पोलीस कटिबद्ध आहेत. दोन्ही ठिकाणी कायदा हातात घेणाऱयांविरोधात कठोर पावले उचलण्यावर दोन्ही पोलिसांचे एकमत झाले आहे.

राखीव पोलिसांची अतिरिक्त तुकडी तैनात

बुधवारी होणाऱया सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील हालचालींवर पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे. बेळगाव, बिदर, गुलबर्गा, विजापूर याबरोबरच महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग जिह्यात कोणत्याही परिस्थितीत अशांतता निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. या भागात पेट्रोलिंग सुरू केले आहे. निपाणी, कागवाड व संकेश्वर तालुक्मयातील आंतरराज्य हद्दीवर कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांतर्फे संयुक्त तपास नाके सुरू करण्यात आले आहेत. तसेच कर्नाटक पोलिसांतर्फे बेळगाव जिह्यात 21 तपास नाके सुरू केले आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे, अशी माहिती अलोककुमार यांनी दिली.

बैठकीत बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सतीशकुमार, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्यासह बेळगाव व सिंधुदुर्ग जिह्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत कोल्हापूर, सांगली, सोलापूर, विजापूर, गुलबर्गा येथील पोलीस अधिकाऱयांनी ऑनलाईन सहभाग घेतला.

Related Stories

राणी चन्नम्मा विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या

Patil_p

निपाणी पालिकेतर्फे विनामास्क कारवाईला गती

Omkar B

सोमवारी कोरोनाचे 16 नवे रुग्ण

Patil_p

जिल्हय़ात लवकरच धावणार फिरती पशुचिकित्सालये

Patil_p

ऊसतोड, रताळी काढणीची कुद्रेमनी भागात धांदल

Amit Kulkarni

खंजर गल्लीत मटका अड्डय़ावर छापा

Amit Kulkarni