Advertisements
ऑनलाईन टीम/ तरुण भारत
नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या २४ तासांत ३९६२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पुन्हा एकदा लाॅकडाऊन लागू शकतो का? अशी शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान यापार्श्वभूमीवरआता कोर्बोव्हॅक्स या कोरोना प्रतिबंधक लसीला बूस्टर डोससाठी डीसीजीआयने (DCGI) परवानगी दिली आहे. बायोलॉजिकल ई लिमिटेडनं याची माहिती दिली.
बायोलॉजिकल ई लिमिटेड या फार्मा कंपनीची कोर्बोव्हॅक्स ही लस १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीसीठी वापरली जाते. गेल्या वर्षी २८ डिसेंबर रोजी प्रौढांना आपत्कालिन वापरासाठी ही लस वापरावी अस सांगण्यात आलं होतं. दरम्यान या वर्षी ९ मार्च रोजी काही अटी-शर्तींसह १२ ते १७ वयोगटातील मुलांसाठी कोर्बोव्हॅक्सला परवानगी दिली आहे.