बेळगाव : बेळगाव शहर व जिल्हय़ात रविवारी 41 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे सक्रिय रुग्णसंख्याही वाढली असून प्रत्येकाने खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बेळगाव तालुक्यात 15, बैलहोंगल तालुक्यातील 8, चिकोडी, रामदुर्ग तालुक्यात प्रत्येकी 1, गोकाक तालुक्यात 4, खानापूर तालुक्यात 5, सौंदत्ती तालुक्यात 5 आणि इतर 3 अशा एकूण 41 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी बहुतेक जणांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील 21 लाख 4 हजार 918 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 19 लाख 97 हजार 219 जणांचा अहवाल निगेटिव्ह तर 1 लाख 583 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सक्रिय रुग्णसंख्या 170 वर पोहोचली असून अद्याप 1716 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत.
Previous Articleम. ए. समितीच्या ठिय्या आंदोलनात मोठय़ा संख्येने सहभागी होणार
Next Article देशपांडे गल्लीतील औषध दुकानाला आग
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.