Tarun Bharat

कोरोना नियमाआड… कंत्राटात वाढ!

Advertisements

गोवा अभियांत्रिकीमध्ये व्याख्याता पदभरतीमध्ये मुलाखतींना फाटा : एकाच उमेदवाराला 3वेळा मुदतवाढ

प्रतिनिधी /फोंडा

कोरोना महामारीमुळे काही नियम शिथील करण्यात आले होते. मात्र त्याचा फायदा घेऊन कंत्राटी नोकर भरतीमध्ये मनमानी चालली आहे. फर्मागुडीच्या गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात कंत्राटी व्याख्याते नोकर भरतीमध्ये कोरोनाच्या याच नियमांच्या आड उमेदवार निवडीच्या मुलाखतींना बगल देऊन त्याच उमेदवारांना पुन्हा संधी दिली जात आहे. या पदासाठी पात्र असलेल्या काही स्थानिक उमेदवारांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला आहे.

 फर्मागुडी येथील गोवा आभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मॅकनिकल विभागामध्ये ही मानमानी चालली आहे. कंत्राटी व्याख्याता नोकरभरतीमध्ये गोव्यातील उमेदवारांना डावलून परराज्यातील उमेदवारांना संधी दिली जात आहे. मागील तीन वर्षांपासून हे प्रकार चालले आहेत. मुलाखतीद्वारे कंत्राटाचे नूतनीकरण न करता, त्याच उमेदवारांना पुन्हा या पदामध्ये सामावून घेतले गेले आहे. सन 2019 पासून हा प्रकार चालला असून त्यासाठी कोरोनासंबंधी नियम पुढे केला जात असल्याच्या तक्रारी आहेत.

 मॅकनिकल विभागामध्ये साहाय्यक प्राध्यापकपदांच्या भरतीमध्ये अनुसूचित जाती जमाती (एससी, एसटी) व इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) राखीव जागा असतानाही कर्नाटकातील दोघा उमेदवारांची खुल्या गटातून नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातील ज्या व्याख्यात्याची नियुक्ती केलेली आहे, त्याचा ओबीसी दाखला कर्नाटकातील आहे. तरीही मुलाखत न घेताच सलग तीनवेळा त्याला मुदतवाढ दिली गेली आहे.

ओबीसी परराज्यातील, एसटीची जागा खाली

 या पदभरतीच्या जाहिरातीमध्ये चार जागा खुल्या गटात, 1 ओबीसी व 1 एसटी मिळून सहा जागा जाहीर केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात चार उमेदवारांची भरती करण्यात आली आहे. ओबीसीच्या जागी कर्नाटकातील उमेदवाराची नियुक्ती केली असून एसटीची जागा अद्याप रिक्त ठेवण्यात आली आहे. कर्नाटकातील ज्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात आली आहे, त्याचा रहिवासी दाखला गोव्यातील दाखवण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर तो ओबीसी असल्याबद्दलही संयश व्यक्त होत आहे. स्थानिक राखीव उमेदवारांवर हा अन्याय आहे.

 तीन वर्षांपूर्वी या पदांसाठी गोव्यातील 18 उमेदवारांनी मुलाखत दिली होती. या निवड प्रक्रियेसंबंधी एका उमेदवाराने माहिती हक्क कायद्याखाली मिळवलेल्या माहितीमध्ये एकही एसटी उमेदवार नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पदभरतीसंबंधी जाहिरात व प्रत्यक्ष भरती प्रक्रियेमध्ये तफावत दिसून येत असल्याचे मुलाखतीला गेलेल्या एका उमेदवाराने सांगितले.

मुलाखतींनाच कोरोनाची बाधा का ?

मॅकनिकल विभागात कंत्राटी पद्धतीवर साहाय्यक प्राध्यापक भरतीच्या या कंत्राटाच्या नूतनीकरणात कोरोनाचा नियम पुढे केला जात आहे. थेट मुलाखत घेतल्यास कोरोनासंबंधी सुरक्षित अंतर व अन्य मार्गदर्शक तत्त्वांत बाधा येईल, असा त्याचा अर्थ होतो. मात्र सध्या अभियांत्रिकी महाविद्यालयात नियमित वर्ग भरतात. शाळा महाविद्यालयही सुरु आहेत. गोवा विद्यापीठातर्फे राज्यभरातील इतर महाविद्यालयामध्ये थेट मुलाखतीद्वारेच कंत्राटी व्याख्याता भरती सुरु आहे. असे असताना गोवा अभियांत्रिकीमध्येच कुणाच्या सोयीसाठी या नियमावर बोट ठेऊन मुलाखती टाळल्या जातात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. थेट मुलाखती शक्य नसल्यास ऑनलाईन मुलाखतींचाही पर्याय खुला आहे.

जुन्या नियमांमुळे स्थानिक उमेदवारांवर अन्याय

 व्याख्यात्यांच्या पदभरतीमध्ये काही जुने नियम बदलण्याची मागणीही स्थानिक उमेदवारांकडून केली जात आहे. एकेकाळी या पदांसाठी पात्र स्थानिक उमेदवार मिळत नव्हते, त्यामुळे परराज्यातील उमेदवारांची नियुक्ती केली जायची. सध्या गोव्यात आयआयटी, एनएआयटी पदवीधर असलेले पात्र उमेदवार आहेत. ज्यांना गोव्यात नोकऱया मिळत नाहीत. ही परिस्थिती लक्षात घेऊन जुने नियम बदलण्याची आवश्यकता आहे. सध्या नियुक्ती समितीकडून याच जुन्या नियमांचा फायदा घेऊन व्याखाता पदांसाठी पात्र स्थानिक उमेदवार नसल्याचे भासवून गोमंतकीयांना डावलले जात असल्याची तक्रार आहे.

Related Stories

फोंडय़ाचे नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक यांचा राजीनामा

Omkar B

मेणकुरे येथे आज नर्मदा मैय्याचे पूजन

Amit Kulkarni

मडगावातील बेकायदा गाडय़ाचे अखेर पालिकेकडून सर्वेक्षण

Patil_p

फरारी वाहनचालकास अटक

Omkar B

सरकारने ऑनलाईन शिक्षणासाठी ‘इंट्रानेट’ सुविधेचा वापर करावा विरोधी पक्षनेते श्री. कामत यांची मागणी

Omkar B

निवडणूकीच्या धामधुमीत पेट्रोल इंधन दर शंभरीच्या उंबरठय़ावर स्थिर

Amit Kulkarni
error: Content is protected !!