सात भटक्मया जनावरांची पकडून गो-शाळेत रवानगी
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात भटक्मया जनावरांचा संचार वाढल्याने त्यांना जेरबंद करण्यासाठी महापालिका प्रशासनाचे कर्मचारी पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. मंगळवारी विविध ठिकाणी ठाण मांडलेल्या भटक्मया जनावरांना पकडून गो-शाळेत दाखल करण्यात आले. मध्यंतरी ही मोहीम राबवून जनावरांना जेरबंद करण्यात आले होते. मात्र पुन्हा संचार वाढल्याने कारवाईस प्रारंभ करण्यात आला. शहरात भटक्मया जनावरांची संख्या वाढली असून कुत्री, डुकरे आणि जनावरांचा उपद्रव वाढला आहे. भटक्मया जनावरांना पकडून गो-शाळेत पाठविण्याची कारवाई सातत्याने राबविली जाते. तरीदेखील काही दिवसांनंतर भटकी जनावरे पुन्हा रस्त्यावर फिरू लागतात. भटक्मया जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. तसेच भाजी विपेत्यांना त्रासदायक ठरू लागले आहे. विशेष म्हणजे भटकी जनावरे स्मार्ट बसथांब्यांवर ठाण मांडून घाण करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांना याठिकाणी थांबणे मुश्कील बनत आहे. अनेकवेळा कारवाई करूनदेखील भटकी जनावरे इतरत्र फिरताना दिसत आहेत. त्यामुळे महापालिकेने ही कारवाई पुन्हा हाती घेतली आहे. मंगळवारी बाजारपेठेत फिरणाऱया सात भटक्मया जनावरांना पकडून गो-शाळेत दाखल करण्यात आले.