Tarun Bharat

मनपाची 31 मे रोजी आरक्षण सोडत

ओबीसी शिवाय आरक्षण निघणार, 6 जूनपर्यंत हरकती दाखल करता येणार

कोल्हापूर /प्रतिनिधी
Advertisements

कोल्हापूर महापालिकेची 31 मे रोजी आरक्षण सोडत निघणार आहे. यासंदर्भात 6 जुनपर्यंत हरकती दाखल करता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह येथे सोडत निघणार आहे. प्रथमच ओबीसीशिवाय आरक्षण सोडत असणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीशिवाय निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे कोल्हापूर महापालिकेची ब्रेक लागलेली निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. मनपाने राज्य निवडणूक आयोगाकडे 31 वॉर्ड आणि 92 नगरसेवक असणारी प्रारूप प्रभागरचना पाठविली होती. मागील आठवडय़ामध्ये ती प्रभागरचना अंतिम करण्यात आली असून मनपाने जाहिरही केली. यानंतर आरक्षण सोडतीकडे सर्वाचे लक्ष होते. सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. यानुसार मंगळवार 31 मे रोजी सोडत होणार आहे. अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत निघणार आहे.,

आरक्षण सोडत कार्यक्रम
27 मे – अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण सोडतीची नोटीस जाहीर करणे
31 मे – आरक्षण सोडत
1 जून – सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध
1 जून ते 6 जून – आरक्षणावर हरकती, सूचना
13 जून – अंतिम आरक्षण जाहीर करणे

Related Stories

मोरेवाडी ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचा आरोप; बरखास्तीची मागणी

Abhijeet Shinde

घटनादुरुस्ती हाच शेवटचा पर्याय

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात 10 हजार ऑक्सिजन बेडचे नियोजन : पालकमंत्री

Abhijeet Shinde

देशात उपासमारीची स्थिती चिंताजनक

Abhijeet Shinde

चंदगड मधील पिळणी, भोगोली बंधारे पाण्याखाली

Abhijeet Shinde

कोगे बहिरेश्वर खडक धरण धोक्याच्या पातळीकडे पाटबंधारे विभागाचे पूर्ण दुर्लक्ष

Abhijeet Shinde
error: Content is protected !!