मराठा युवक संघ आयोजित जिल्हा शरीरसौष्ठव स्पर्धा : प्रवीण कणबरकर ‘बेळगाव हक्मर्युलस’, उमेश गंगणे उत्कृष्ट पोझर
बेळगाव : मराठा युवक संघ बेळगाव व बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आयोजित 57 व्या बेळगाव श्र्री जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत कॉर्पोरेशन जिमच्या विकास सूर्यवंशीने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर ‘बेळगाव श्री’ हा मानाचा किताब पटकाविला तर ‘बेळगाव हक्मर्युलस’ स्पर्धेत प्रवीण कणबरकर अव्वल ठरला. उमेश गंगणे याने उत्कृष्ट पोझर हा किताब पटकाविला.
मराठा मंदिर कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या स्पर्धेत आयबीबीएफ मुंबईच्या नियमानुसार आठ वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. निकाल पुढीलप्रमाणे – 55 किलो गट – 1) आकाश निंगराणे (पॉलिहैड्रॉन) 2) जोतिबा बिर्जे (भवानी) 3) नारायण जोशीलकर (मंथन) 4) सुनील भुजनाळ (रॉ फिटनेस) 5) केतन भातकांडे (युनिव्हर्सल). 60 किलो गट – 1) उमेश गंगणे (एसएसएस फाऊंडेशन) 2) बबन पोटे (रॉफ फिटनेस) 3) रोहन अल्लूर (कॉर्पोरेशन) 4) कपिल कामाण्णाचे (रॉ फिटनेस) 5) ओमकार पाटील (युनिव्हर्सल). 65 किलो गट – 1) विनायक अनगोळकर (बॉडी बेसिक) 2) नागेश संताजी (श्र्री जगदंबा) 3) मंजुनाथ सोनटक्की (बॉडी वर्क) 4) रोहन पालनकर (फिटनेस फोर्ज) 5) विजय निलजी (भैरवी फिट). 70 किलो गट – 1) विजय पाटील (बी स्ट्राँग) 2) सुनील भातकांडे (एक्स्ट्रीम) 3) संदीप पावले (मॉडर्न) 4) विनित हणमशेट (रॉ फिटनेस) 5) गणेश पाटील (मोरया जिम). 75 किलो गट – 1) प्रताप कालकुंद्रीकर (पॉलिहैड्रॉन) 2) अफरोज ताशिलदार (गोल्ड) 3) राहुल हिरोजी (युनिव्हर्सल) 4) विनायक चव्हाण (बॉडी बेसिक) 5) अंकुश टपाले (बॉडी वर्क). 80 किलो गट – 1) महेश गवळी (ऊद्र) 2) गजानन काकतीकर (एसएसएस फाऊंडेशन) 3) दयानंद निलजकर (बॉडी बेसिक) 4) प्रशांत पाटील (फिटनेस क्लब, खानापूर). 80 किलोवरील गट – 1) विकास सूर्यवंशी (कॉर्पोरेशन) 2) व्ही. बी. किरण (राजू मोरे फाऊंडेशन) 3) एम. डी. साकीब (सेव्हन स्टार, चिकोडी) 4) राघवेंद्र नाईक (मोरया) 5) आदित्य पाटील (बी स्ट्राँग) यांनी विजेतेपद पटकाविले.
त्यानंतर बेळगाव श्री किताबासाठी विकास सूर्यवंशी, महेश गवळी, प्रताप कालकुंद्रीकर, विजय पाटील, विनायक अनगोळकर, आकाश निंगराणी व उमेश गंगणे यांच्यात लढत झाली. त्यामध्ये विकास सूर्यवंशी, प्रताप कालकुंद्रीकर यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये कॉर्पोरेशनच्या विकास सूर्यवंशीने बाजी मारत बेळगाव श्र्री हा मानाचा किताब पटकाविला. बेळगाव हक्मर्युलस स्पर्धेत 1) प्रवीण कणबरकर, 2) विजय गावडा, 3) सुनील चौधरी यांनी विजेतेपद पटकाविले. विजेत्या स्पर्धकांना मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, संजय मोरे, माऊती देवगेकर, चंद्रकांत गुंडकल, रघुनाथ बांडगी, नेताजी जाधव, अजित सिद्दण्णावर, एम. के. गुरव, गंगाधर एम., दिनकर घोरपडे, संजय सुंठकर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विकास सूर्यवंशीला एस. के. सिद्दण्णावर यांच्या स्मरणार्थ ठेवलेला फिरता चषक, 15 हजार ऊपये रोख, मानाचा किताब व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. बेळगाव हक्मर्युलस टॉप टेन विजेत्या प्रवीण कणबरकरला 5 हजार ऊपये रोख, चषक, मानाचा किताब व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट पोझर उमेश गंगणे याला चषक, 5 हजार ऊपये रोख, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.