Tarun Bharat

Rajya Sabha Election LIVE :राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होण्यास विलंब लागणार

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मुंबई: भाजपने जितेंन्द्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुहास कांदे यांनी नियमबाह्य मतदान केल्याचा आरोप करत मते बाद करावीत अशी मागणी भाजपच्या निवडणूक अधिकारी योगेश सागर आणि अतुल सावे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलीयं. नियमबाह्य मतदानाच्या आक्षेपावर केंद्रीय निवडणूक आयोग जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत मतमोजणी सुरू होणार नाही. अशी भूमिका त्यांनी घेतल्याने राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू होण्यास विलंब लागणार आहे.


आज सकाळपासूनच राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी अटीतटीची लढत झाली. भाजपने मतदानामध्ये आभेप घेताच काॅंग्रेसच्या अमर राजूरकर यांनी सुधीर मुनगंटीवारांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. मुनगंटीवार यांनी मतपत्रिका चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातात दिल्याने काॅंग्रेसने हरकत घेतली आहे. यामुळे विधानसभेत काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र निवडणूक आयोगोने भाजपचे अपील फेटाळले. दरम्यान काॅंग्रेसने केलेल्या आरोपाने निवडणूक आयोग काय भुमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान आज ५ वाजता मतमोजणी सुरु होऊन ७ पर्यंत निकाल लागणार होता. मात्र भाजपच्या या मागणीने मतमोजणी सुरु होण्यास विलंब लागणार असून निकाल लागण्यास ही वेळ लागणार आहे.

Related Stories

JEE, NEET परीक्षा वेळेतच होणार : सुप्रीम कोर्ट

datta jadhav

तबलिगी जमातीचे प्रमुख मौलाना साद यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

prashant_c

पराभव अमान्यच; 7.10 कोटी मते मिळाल्याचा ट्रम्प यांचा दावा

datta jadhav

काँग्रेसचे प्रदेश अधिवेशन फैजपूरला

datta jadhav

माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

Abhijeet Shinde

परदेशी शास्त्रज्ञांचा सिरम इन्स्टिट्यूट दौरा रद्द

datta jadhav
error: Content is protected !!