Tarun Bharat

राशींचा देश-टॅरो चा संदेश

दि. 22-5-2022 ते 28-5-2022

मेष

Advertisements

हा आठवडा साधारणपणे कौटुंबिक नातेसंबंधामध्ये गुंतागुंतीचा असेल. परिवारातील एखाद्या सदस्याच्या मनाप्रमाणे वागण्यासाठी तुम्ही बांधील असाल. आर्थिक नियोजनासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. एखाद्या कामामध्ये जास्त पैसा खर्च होऊ शकतो. लव मेट्सनी नात्याच्या गंभीरतेबद्दल विचार करावा. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आवळय़ाच्या झाडाला पाणी घाला.

वृषभ

 कोणतेही काम करताना दहादा विचार करून करावे असा संदेश आहे. एखादे काम चुकू शकते. त्यातून मनस्ताप होऊ शकतो. या आठवडय़ात स्वतःकरताही वेळ काढावा असे वाटेल. एखादा छंद जोपासावा ज्याने तणाव कमी होईल. आर्थिक आवक सर्वसामान्य असेल. नातेसंबंध विस्तारतील. कुटुंबाकरता खर्च कराल.

लहान मुलींना फणी भेट द्यावी.

मिथुन

कामाच्या व्यापामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष होत आहे असे जाणवेल. नको ती कामे अंगावर पडल्यामुळे गोंधळ उडण्याची शक्मयता आहे. पाठीचे दुखणे किंवा सांध्यांचे दुखणे त्रास देऊ शकते. आठवडय़ाच्या मध्यावर मन थोडे उदास असेल. मित्रांमध्ये वेळ घालवा. आर्थिक बाबतीत तुमचे अंदाज बरोबर ठरतील.

रातराणीची फुले जवळ ठेवावी.

कर्क

तुमच्या अपेक्षा आणि तुमची स्वप्ने यांची पूर्तता होण्याचा काळ आहे. पण अवाजवी अपेक्षा आनंद हिरावून घेऊ शकतात. या सगळय़ामध्ये कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. कुटुंबातील सदस्यांना तुमच्या सल्ल्याची आणि मार्गदर्शनाची गरज असेल. भावनिक गुंतागुंत न होता युक्तीने अडचणींवर मात कराल.

हिरव्या रंगाचा हात रुमाल जवळ ठेवावा.

सिंह

तुमच्या अधिकार क्षेत्रातील काही गोष्टी दुसऱयांच्या हस्तक्षेपामुळे बिघडू शकतात. इतरांनी आपल्या कामात लक्ष देऊ नये असे तुम्हाला वाटेल. बऱयाच कामांना गती मिळेल. परिवारातील वातावरण चांगले असेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर एखाद्या घटनेविषयी चर्चा कराल. प्रेमींनी भावनांचा अतिरेक होऊ नये याची काळजी घ्यावी. जोडीदाराला लाल रंगाची फुले भेट द्या.

कन्या

 सध्या चालू असलेल्या कामांमुळे जे अत्यंत महत्त्वाचे काम आहे त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. पूर्वी केलेल्या नियोजनामुळे कामे पूर्ण होतील. आर्थिक आवक बऱयापैकी असेल. लेखी व्यवहार करत असताना सावध असावे लागेल. नोंद ठेवल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नका. कौटुंबिक वातावरणात थोडा ताण जाणवेल.

भटक्या कुत्र्यांना अन्न घालावे.

तूळ

या आठवडय़ात काहीशा फसव्या आशा, गोंधळ आणि खोटय़ा कल्पना समोर येऊ शकतात. इतरांनी दिलेला चांगला सल्ला ऐकावा. मदतीचा हात स्वीकारावा. काही घडलेल्या घटनांमुळे तुमचे मन विचलित होऊ शकते. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या व्यक्तीवर किंवा जिथे अतिशय विश्वास टाकला आहे त्याच ठिकाणी घात होऊ शकतो. मन स्थिर ठेवून निर्णय घ्यावा.

गुलाबाचे अत्तर लावावे.

वृश्चिक

संधी समोर येत आहेत त्याचा फायदा लगेच उचलावा. नंतर करू नंतर बघू म्हणून हातातील संधी सोडू नये. कुटुंब सुख चांगले मिळेल. आर्थिक प्रगती मनासारखी होईल. कामाला उशीर झाला तरी चिडून न जाता स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जावे. भौतिक सुख चांगले मिळेल.

धनु

दिव्यांगाना आर्थिक मदत करावाr.

या आठवडय़ात काही बदलांना समोरे जावे लागू शकते. आर्थिक आलेख खाली-वर होऊ शकतो. पैशाचे गणित चुकत आहे. काही वैयक्तिक अडचणी येऊ शकतात. पैशामुळे वादावादी संभवते. नातेसंबंधांमध्ये बदल होत जातील. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असे होऊ शकते. प्रकृतीला सांभाळावे लागेल.

हळकुंड जवळ ठेवावे

मकर

खात्रीशीर बदल संभवतात. तुमच्या अधिकारांमध्ये वाढ होईल. दुसऱयांचे दोष दाखवण्याच्या सवयीला आवर घालावा लागेल. समोर आलेल्या संधी फायदेशीर आहेत का हे नीट तपासून निर्णय घ्यावा कारण त्यावरच यश अवलंबून आहे. वेळ न घालवता काम करावे. आपली इच्छा इतरांवर लादू नये.

पिंपळाला पाणी घाला.

कुंभ

चांगले आणि वाईट याचे योग्य ज्ञान असलेली व्यक्ती तुम्हाला सल्ला देईल ज्या योगे तुमच्या कामामध्ये यश मिळेल. एखाद्या स्त्रीचा मौलिक सल्ला फायदा देऊ शकतो. या आठवडय़ात मन उदार असेल. पैशांची आवक उत्तम असेल. काही कारणाने सभोवतालचे वातावरण बिघडू शकते. अकारण तुमच्यावर अविश्वास दाखवला जाऊ शकतो. नाग केशराचे दाणे जवळ ठेवावे

मीन

सध्या तुमचा सगळा फोकस भविष्यावर असणार आहे. भविष्यात काय घडेल यावर तुमचे लक्ष असेल. सध्याच्या अडचणींवर मात कराल. सकारात्मक गोष्टींना सुरुवात होईल. तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. तुमच्या चांगुलपणाचे कौतुकही होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. सध्याच्या कटकटींपासून सुटका मिळणार आहे. अन्नदान करा

टॅरो उपाय ः  घरातील किंवा कामाच्या ठिकाणातील नकारात्मकता, बाधा, वाईट शक्ती यांना बाहेर घालवण्याकरता  सायंकाळी  निखाऱयांवरती थोडी पिवळी मोहरी, गुग्गुळ, लोबान, तुरटीचा तुकडा, हिंग, अगदी थोडी लाल मिर्ची, भीमसेनी कापूर, सर्वौषधीची पूड घालून पूर्ण जागेवर धूर फिरवावा.

Related Stories

राशिभविष्य

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 22 जून 2021

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 29 फेब्रुवारी 2020

tarunbharat

आजचे भविष्य गुरुवार 22-10-2020

Omkar B

आजचे भविष्य शुक्रवार दि. 28 ऑगस्ट 2020

Patil_p
error: Content is protected !!