Tarun Bharat

राशींचा देश-टॅरो चा संदेश

दिनांक 15-05-2022 ते 21.05.2022

मेष

Advertisements

 कर्तृत्वाला वाव आणि धडाडीला संधी मिळेल.  हाती घेतलेल्या कामाला यश मिळेल. कित्येक संधी तुमच्यासमोर उभ्या राहतील पण त्यातल्या योग्य संधीची निवड करणे महत्त्वाचे ठरेल. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्य हेही महत्त्वाचे आहे. चिडचिड केल्याने तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. पारिवारिकदृष्टय़ा हा काळ अनुकूल आहे. पैशांची आवक चांगली असेल.

काळा हकीक जवळ ठेवावा.

 वृषभ

 सामाजिक कार्यामध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. या आठवडय़ात तुमचा स्वभाव धार्मिकतेकडे   झुकलेला असेल.  शक्मयतो आपल्या कामांवर लक्ष केंद्रित करा. दुसऱयांच्या कोणत्याही बाबतीमध्ये हस्तक्षेप करू नका. तब्येतीला जपण्याचा काळ आहे. या आठवडय़ात पारिवारिक समाधान अनुभवाला येईल. एखादे काम होता होता राहू शकते.

 नारळाच्या झाडाला पाणी घालावे.

 मिथुन

जबाबदाऱयांमध्ये वाढ होण्याची शक्मयता आहे. एखाद्या वृद्ध व्यक्तीमुळे मानसिक चिंता वाढू शकते. सहकाऱयांबरोबर वर्तणूक चांगली ठेवा. निंदानालस्ती करणे टाळावे. एखाद्या स्त्रीमुळे फायदा होण्याची शक्मयता आहे. पाण्याच्या ठिकाणी प्रवास करण्याचा योग संभवतो. या आठवडय़ात  मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत वेळ घालवाल.

केळीच्या झाडाजवळील माती जवळ ठेवावी

कर्क

या आठवडय़ात कामांमध्ये चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. तब्येतीच्या लहानसहान तक्रारी संभवतात. अकारण मन उदास होऊ शकते. एखाद्या व्यक्तीवरील अतिविश्वास धोकादायक ठरू शकतो. अनावश्यक वस्तुंवर अती खर्च होण्याची शक्मयता आहे. परिवारातील सामंजस्य वाढेल. प्रेमींनी आपल्या उणीवा झाकू नयेत.

तहानलेल्या पशुंसाठी पाण्याची सोय करावी.

 सिंह

या आठवडय़ात रागावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. कुटुंबीयांसोबत एखाद्या मंदिराला  भेट देऊ शकता. कामाच्या ठिकाणी वादविवादाची शक्मयता आहे. आपले काम बरे आणि आपण बरे हे धोरण ठेवावे. मंगलकार्य संभवते. या आठवडय़ात कदाचित पैशाची चणचण जाणवू  शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रेमीजनांनी एकमेकाला उपहार द्यावा.

 वृद्धाश्रमात फळांचे दान करावे.

 कन्या

घाई गडबडीमुळे कामांमध्ये चुका होऊ शकतात. एखादी व्यक्ती तुमच्याकडून पैशांची मागणी करू शकते. या आठवडय़ात थोडा एकटेपणा जाणवेल. वैवाहिक जीवनात थोडे चढ-उतार येतील. परिवारातील शांति भंग होऊ नये म्हणून प्रयत्न करावे. आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवा.

निर्धन व्यक्तीला आर्थिक मदत करा.

 तूळ

या आठवडय़ामध्ये ताणतणावांमध्ये वाढ होण्याची शक्मयता आहे. लहानसहान गोष्टींमुळे मन खचून जाणार याचा प्रयत्न करा. पुढे जाऊन यश तुमचेच आहे याची खात्री बाळगा. कोणाकडूनही कुठल्याही प्रकारचा उपहार स्वीकारू नये. आर्थिक नियोजन चुकू शकते. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. व्यवहार स्वच्छ ठेवा.

छत्रीचे दान करावे

वृश्चिक

तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये विश्वास ठेवता येण्यासारखे किती जण आहेत याचा साक्षात्कार करून देणारा हा आठवडा असेल. आयत्या वेळी कोण कामाला येतो हे तुम्हाला कळेल. घरातील एखाद्या व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. पैशांच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. प्रेमीजनांनी पुढचा विचार करावा. 

लाल रंगाचा हात रुमाल जवळ ठेवावा.

 धनु

कामाचा व्याप वाढेल. शिक्षणासंबंधी कामामध्ये यश मिळेल. या आठवडय़ामध्ये परिवारातील एखाद्या सदस्याच्या वैयक्तिक समस्यांविषयी चर्चा करावी लागू शकते.  दीर्घकाळ लांबलेले एखादे काम पूर्ण होईल. लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. तुमचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी आक्रमक होऊ नका. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात.

लहान मुलांना शिक्षणासाठी मदत करावी

 मकर

तुमच्या जवळच्या व्यक्ती तुम्हाला मदत करण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत, ती मदत नाकारू नका. या आठवडय़ात काही बदलांना सामोरे जावे लागेल. हे बदल कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात असू शकतात. तुम्ही पूर्वी केलेल्या चांगल्या कर्मांचे फळ तुम्हाला मिळेल. वैवाहिक जोडीदाराबरोबर काही  महत्त्वाच्या बाबतीत चर्चा कराल. पैसे उधार देणे आणि घेणे टाळावे.

निळा हात रुमाल जवळ ठेवा.

कुंभ

काही महत्त्वाच्या बाबींमध्ये आर्थिक तजवीज नीट होईल ना याची काळजी वाटेल. या आठवडय़ामध्ये काही बाबतींमध्ये संघर्षाला सामोरे जावे लागेल. माणसांना आणि परिस्थितीला नीट सांभाळून घ्यावे लागेल. योग्य कारणांकरिता खर्च होतोय याची काळजी घ्या. प्रेमींना विरोधाचा सामना करावा लागू शकतो.

कुंभाराकडची माती जवळ ठेवावी.

 मीन

नवीन कामाकरता अर्ज करू शकाल. नवीन प्रकल्प हातात घ्याल. काही गोष्टींमध्ये लोकांची मदत घ्यावी लागू शकते. कोणत्याही कारणाने दुसऱयांवर काम टाकणे टाळा. तुमच्या आतला आवाज ऐका. तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. परिवारातील वातावरणाला सुखमय कराल. प्रेमींना उपहार मिळू शकतो.

जलचरांना कणकेचे खाणे घाला.

 टॅरो उपाय ः  घरात कायम सुख शांती नांदावी याकरता एका असोल्या  नारळावर कापूर ठेवून तो पेटवावा आणि नारळ घरभर फिरवावा. हा उपाय संध्याकाळी करायचा आहे.

Related Stories

आजचे भविष्य मंगळवार दि. 21 डिसेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य 28-01-2022

Amit Kulkarni

आजचे भविष्य मंगळवार दि. 4 ऑगस्ट 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 2 नोव्हेंबर 2021

Patil_p

राशीभविष्य

tarunbharat

आजचे भविष्य सोमवार दि. 22 नोव्हेंबर 2021

Patil_p
error: Content is protected !!