Tarun Bharat

चिपळूणमध्ये जेवणातून विष घेऊन जोडप्याची आत्महत्या

रत्नागिरी/प्रतिनिधी

चिपळूण तालुक्यातील अलोरे चेंबरी या ठिकाणी विवाहित जोडप्याने जेवणातून विष घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.प्रेम विवाह केलेल्या जोडप्याने दुपारी कामावरुन घरी परत आल्यानंतर जेवणातून विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.संजय सदा निकम आणि सोनाली संजय निकम अशी आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या जोडप्याने आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

संजय निकम याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्याने सोनाली हिच्याशी प्रेमविवाह केला होता.दोघेही मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह चालवत होते. काल दुपारी नेहमीप्रमाणे दोघेही मजुरीचे काम करून आपल्या घरी आले होते.घरी आल्यानंतर जेवणातून विष घेऊन ते झोपी गेले होते, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सायंकाळी घरामधील बकऱ्या चरायला घेऊन गेलेली आजी घरी परतल्यानंतर त्यांनी या दोघा नवरा-बायकोला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला.परंतु ते कोणताच प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावलं.यावेळी पती-पत्नी मयत असल्याचं कळलं.यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. चिपळूण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Related Stories

अनलॉकपेक्षा रत्नागिरी जिल्हय़ात 9 जूनपर्यंत कडक निर्बंध

Patil_p

भीक मांगो आंदोलनातून जमा झाले हजारो रूपये!

Patil_p

रत्नागिरीतील नेवरे गावी फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप केली सुटका

Archana Banage

दाऊदच्या लोटेतील भूखंडाचा 1 कोटी 10 लाखाला लिलाव

Patil_p

स्वा.लक्ष्मी चौकात ‘पे ऍन्ड पार्क’ नको!

Patil_p

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह १५ जिल्हा ग्रामीण बँकेला शासकीय बँकिंग व्यवहार करण्यास मान्यता

Archana Banage
error: Content is protected !!