Tarun Bharat

मोटारसायकली चोरणाऱया जोडगोळीला अटक

Advertisements

कुडची पोलिसांची कारवाई : 14 लाख रुपये किमतीच्या 26 मोटारसायकली जप्त

प्रतिनिधी /बेळगाव

दोघा अट्टल मोटारसायकल चोरांना कुडची (ता. रायबाग) पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 14 लाख रुपये किमतीच्या 26 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांनी ही माहिती दिली आहे.

प्रवीण हिरेमणी (वय 30), अब्दुलमुनाफ कदडी (वय 25, दोघेही रा. कुडची) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी या जोडगोळीला अटक करणाऱया पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

अथणीचे पोलीस उपअधीक्षक श्रीपाद जलदे, हारुगेरीचे पोलीस निरीक्षक के. एस. हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली कुडचीचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज धरीगोण, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के. आर. साळुंखे, वाय. एम. हलकी, एम. के. खनदाळ, पी. एल. खवटकोप्प, एस. ए. पाटील, ए. ए. मुदनाळ, एस. एम. हलकी व तांत्रिक विभागाचे विनोद ठक्कण्णावर, सचिन पाटील आदींनी ही कारवाई केली आहे.

मोटारसायकली चोरल्याची कबुली

या जोडगोळीने रायबाग तालुक्मयातील कुडची, चिंचली, कागवाड तालुक्मयातील उगार बुद्रुक, मंगसुळी आदी गावांत मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे. काही मोटारसायकली त्यांनी आपल्या घराजवळ ठेवल्या होत्या. तर विक्रीसाठी काही मोटारसायकली हिडकल, अळगवाडी व कुडची येथे ठेवल्या होत्या. त्यांच्याजवळून 26 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

Related Stories

डिझेल शवदाहिनी-अंत्यविधी शेडची दुरुस्ती करा

Amit Kulkarni

शिक्षक बदली प्रक्रियेचे कौन्सिलिंग 16 डिसेंबरपासून

Patil_p

सोमवंशीय क्षत्रीय समाजातर्फे अंबाबाई मंदिरामध्ये महापूजा उत्साहात

Omkar B

निलजीतील ‘त्या’ तलावाचे काम निकृष्टदर्जाचे

Amit Kulkarni

ओंकारनगरमध्ये सांडपाण्यामुळे रहिवासी हैराण

Amit Kulkarni

बाजारात रानमेवा दाखल

Amit Kulkarni
error: Content is protected !!