नवी दिल्ली
केंद्रीयमंत्री अनुराग ठाकुर आणि भाजप खासदार परवेश वर्मा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. सीपीआय-एम नेत्या वृंदा करात आणि के. एम. तिवारी यांनी कनि÷ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत उच्च न्यायालयात यासंबंधी याचिका दाखल केली होती. भाजप नेत्यांच्या द्वेषपूर्ण भाषणानंतरच फेब्रुवारी 2020 मध्ये पूर्व दिल्लीत दंगल उसळल्याचा दावा याचिकेत दावा करण्यात आला होता.
2020 मध्ये वृंदा करात यांनी दोन्ही नेत्यांवर भडकाऊ भाषण केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. केंद्रीयमंत्री अनुराग ठाकुर आणि भाजप खासदार परवेश वर्मा यांच्याविरुद्ध द्वेषपूर्ण भाषणांसाठी एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देण्यास नकार देताना सत्र न्यायालयाने करात आणि तिवारी यांची याचिका फेटाळली होती. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण करून दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रधारी सिंह यांनी 25 मार्च रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता.