Uddhav Thackeray vs Eknath Shinde : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने ८ ऑगस्टला सुनावणी होणार असा आदेश दिला. तसेच पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय नको असे निवडणूक आयोगाला सांगितले. शिवसेना ठाकरेंची कि शिंदेंची? कोर्ट आज काय निर्णय देणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र सुनावणी आता सोमवारी होणार असल्याने पुन्हा धनुष्यबाण कोणाकडे राहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अरविंद सावंत यांनी कोर्टाच्या सुनावणीनंतर प्रतिक्रिया दिली आहे.
सुभाष देसाई यावेळी ते म्हणाले, शिंदे गट निवडणूक आयोगाकडे गेला आहे. शिवसेना आमचीच आहे असा दावा केला आहे. यावर न्यायालयाने पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नका असे निवडूक आयोगाला सांगितले आहे. याआधी विधानसभा अध्यक्षांनाही सांगण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाला कसली घाई आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला.
विस्तारीत खंडपीठाबद्दल बोलताना ते म्हणाले की, याचा सर्वसी अधिकार न्यायालयाकडे आहे. आम्ही न्य़ाय मागण्यासाठी आलो आहेत. आमची बाजू आम्ही मांडली आहे. आमच्यावर अन्याय झाला आहे. मुळ शिवसेना पक्ष बळकवण्याचा दुष्ट प्रयत्न राज्य़ात केला जात आहे. तो प्रयत्न हाणून पाडण्याची गरज आहे. बेकायदेशीर सरकारला स्थगिती दिली पाहिजे. शिवसेनेकडून एकूण सहा याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. अनेक घटनात्मक,कायदेशीर मुद्दे आहेत त्यामुळे वेळ लागत आहे असेही देसाई म्हणाले.
त्यांचा तर्क चालणार नाही, तर कायदा चालणार : अरविंद सावंत
अरविंद सावंत म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (३ ऑगस्ट) ज्या पद्धतीने त्यांच्या वकिलांना उलट प्रश्न केले तेव्हा त्यांनी कोणताही संवैधानिक मुद्दा मांडला नाही. त्यांनी कायद्याचा देखील कोणताही उल्लेख केला नाही. ते सातत्याने तार्किक युक्तिवाद करत राहिले. तेव्हा हे लक्षात येत होतं की त्यांचा तर्क चालणार नाही, तर कायदा चालणार आहे.”त्यामुळे न्याय हा मिळणारच असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.
कोर्टाच्या सुनावणीनंतर शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया; काय म्हणाले, वाचा सविस्तर
Advertisements