तरुण भारत

सरकारी रुग्णालयातच उपचार घ्या; अनिल देशमुखांना न्यायालयाचा झटका

ऑनलाईन टीम / पुणे :

मनी लाँड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी वैद्यकीय उपचारांसाठी खासगी रुग्णालयाची परवानगी मागितली होती. मात्र, मुंबई सत्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. खांद्यावरील शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयाची गरज नाही. जे.जे. रुग्णालयात उपचार होऊ शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Advertisements

देशमुख यांना खांदेदुखीचा त्रास आहे. निखळलेल्या खांद्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी द्या, अशी मागणी देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. जे.जे. रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे वाढते वय पाहता सरकारी रुग्णालयाऐवजी खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी मिळावी, असे या अर्जात म्हटले होते. मात्र ईडीनं देशमुखांवर तातडीनं शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही, हे सांगणारा अहवाल न्यायालयात सादर केला होता. तसेच खासगी ऐवजी जे.जे. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया होऊ शकते, असेही म्हटले होते.

त्यावर आज निर्णय सुनावताना निखळलेल्या खांद्यावरील शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयाची गरज नाही. जे.जे. रुग्णालयात उपचार होऊ शकतात, असे न्यायालयाने सांगितले.

Related Stories

मुश्रीफ, यड्रावकर, कोरे, नरकेंनी केले आमदार जाधव कुटुंबीयांचे सांत्वन

Sumit Tambekar

सांगली : जाडरबोबलाद लिंगायत स्मशान भुमीतील पत्र्याचे शेड गायब; चौकशीची मागणी

Abhijeet Shinde

ब्रेकिंग न्यूज…मनपा-झेडपी निवडणूक जाहीर..’या’ व्हायरल मॅसेजमुळे इच्छुक गोंधळात

Abhijeet Shinde

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत द्या

Patil_p

शेतकऱयांना पिक विमा भरण्यास मार्गदर्शन करा

Patil_p

अभिनय सम्राट

Patil_p
error: Content is protected !!