बेळगाव : कपिलेश्वर मंदिराचा कायापालट झाला. या मंदिराला एक वेगळे वैभव प्राप्त झाले, विकास झाला. हे सर्व होत असताना या मंदिरावर प्रशासक नेमण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र, प्रशासनाच्या प्रस्तावाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून कपिलेश्वर मंदिर ट्रस्टला मोठा दिलासा मिळाला आहे. जनतेतून व भक्तांतून समाधान व्यक्त होत आहे. कपिलेश्वर मंदिर हे ब श्रेणीमध्ये होते. मात्र, क श्रेणीत घालून धर्मादाय खात्याच्या जिल्हा कमिटीचे प्रशासन नेमण्याचा प्रयत्न होता. गेल्या काही वर्षांपासून मंदिराचा विकास झाला आहे. याचबरोबर विविध धार्मिक कार्यक्रम तसेच भक्तांसाठी वेगवेगळे उपक्रमदेखील राबविण्यात आले आहेत. असे असताना त्यावर प्रशासक नेमून मंदिराचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याठिकाणी मंदिर ट्रस्ट कमिटीच्यावतीने अॅड. संग्राम कुलकर्णी यांनी आपली भूमिका ठामपणे मांडत न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिली. महत्त्वाचे म्हणजे धर्मादाय खात्याची जी कमिटी नेमण्यात आली होती, ती कमिटी नेमताना जिल्हाधिकारीच अनुपस्थित होते, हे देखील उघडकीस आले होते. त्यामुळे ती कमिटीदेखील बेकायदेशीरच असल्याचे म्हटले जात आहे. एकूणच धर्मादाय खात्याच्या माध्यमातून शहरातील विविध मंदिरांचा कब्जा घेण्यासाठी काहीजण सक्रिय झाले होते. मात्र, त्यांना आता मोठा दणका बसला आहे. कपिलेश्वर मंदिर हे दक्षिण काशी म्हणूनच ओळखले जाते. गेल्या काही वर्षांपासून या मंदिरामध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे भक्तांतूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. असे असताना प्रशासक नेमण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थगिती मिळाल्याने आता या मंदिराच्या ट्रस्टला मोठा दिलासा मिळाला आहे.
Previous Articleकोटीचे घबाड मात्र कर्तव्यात बिघाड!
Next Article नागरी सुविधांसाठी मारुती गल्लीत रास्तारोको
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.