Tarun Bharat

मळेवाड गावात गव्यांचा उपद्रव वाढला

Advertisements

शेतकरी वर्ग चिंतेत

न्हावेली/ वार्ताहर  –

मळेवाड येथील (पानाचे भोम ) सड्या वरील शेतात सध्या गव्या रेड्यानी शेतकऱ्यांची झोपच पळविली.येथील शेतात शेतकऱ्यांनी सध्या भुईमूग,भातशेती,नाचणी पिकाची शेती केली आहे.सध्या शेती सुद्धा चांगली झाली  आहे.मात्र गव्या रेड्यांच्या कळपाने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणीच पळविले.येथील शेतकरी दिवस रात्र शेतीची राखण करतात,मात्र  शेतकऱ्यांची नजर चुकवत  हा गव्यांचा कळप येऊन शेताची नासधूस करत आहे.यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून,याबाबत लवकरात लवकर  वनविभागाने तात्काळ दखल घेऊन,शेतीचे पंचनामे करून,गाव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Related Stories

वाईल्ड सिंधुदुर्ग डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर आज निसर्गप्रेमींच्या भेटीला

NIKHIL_N

खेडमध्ये वाळू वाहतुकीचे चार डंपर ताब्यात

Patil_p

महामार्गावर खड्डे प्रवास ठरतोय धोकादायक

Patil_p

दुचाकी अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू

Patil_p

जिह्यात कोरोनाचा मृत्युदर पुन्हा 3 टक्क्यांवर

Patil_p

सावंतवाडीत भाजप तर्फे उद्धव ठाकरे सरकारचा निषेध

NIKHIL_N
error: Content is protected !!