Tarun Bharat

काश्मिरी पंडितांवर शोपियानमध्ये भ्याड हल्ला

एकाचा मृत्यू ः अन्य जखमी ः पुन्हा टार्गेट किलिंगच्या घटनेने खळबळ

श्रीनगर / वृत्तसंस्था

दक्षिण काश्मीरमधील शोपियानमधील छोटेपोरा भागात एका सफरचंदाच्या बागेत काम करणाऱया दोन काश्मिरी पंडित बांधवांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. एकाचा मृत्यू झाला तर दुसरा भाऊ जखमी झाला आहे. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याने काश्मीरमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच हल्लेखोरांच्या शोधासाठी परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर काश्मिरी पंडित संघर्ष समितीने (केपीएसएस) मंगळवारी दहशतवाद्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या समुदायाच्या सदस्यांना खोरे सोडण्याची सूचना केली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये शोपियान येथे सफरचंदाच्या बागेत दहशतवाद्यांकडून दोन भावांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका भावाचा मृत्यू झाला, तर एक जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून स्थलांतरितांना लक्ष्य केले जात असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली आहे. सुनील कुमार असे त्यांचे नाव असून, पिंटू कुमार जखमी झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काश्मीर पोलिसांनी ट्विट करत या घटनेची माहिती दिली आहे.

‘केपीसीसी’ने व्यक्त केला संताप

आणखी एक प्राणघातक हल्ला करून दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांना खोऱयातून संपविण्याचा घाट घातल्याचा आरोप ‘केपीसीसी’चे प्रमुख संजय टिकू म्हणाले. तसेच त्यांनी सर्व काश्मिरी पंडितांना खोरे सोडून जम्मू आणि दिल्लीसारख्या सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच अल्पसंख्याकांना विशेषतः काश्मिरी पंडितांना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आम्ही असे किती दिवस मरत राहणार आहोत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Related Stories

रंजन गोगोईंविरुद्ध अधिकार हनन प्रस्ताव

Patil_p

मूलभूत शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘एनईपी’ची रचना

datta jadhav

हिमाचल प्रदेशात काँग्रेसला खिंडार; 26 बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश

datta jadhav

भारत-अमेरिका युद्धाभ्यासात कोरोनाची एंट्री

Patil_p

कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट येण्याचा धोका

Patil_p

मोहरीचा दाणा, मोडेल रोगांचा कणा

Patil_p