वनमंत्री विश्वजित राणे यांचा आदेश : कासवांच्या क्षेत्रात पार्ट्या चालल्याच्या तक्रारी
पणजी : मोरजी समुद्रकिनारी जिथे कासव अंडी घालतात आणि ज्या जागा राखीव क्षेत्र आहे, तिथे मोठ्या प्रमाणात पार्ट्या चालतात. गुऊवारी रात्री अशीच एक पार्टी उशिरापर्यंत सुरु होती, अशी माहिती वन खात्याकडे आल्यानंतर वनमंत्री विश्वजित राणे यांनी या प्रकरणी संबंधित व्यक्तींविऊद्ध कडक कारवाई करण्याचा आदेश वनअधिकाऱ्यांना दिला आहे. वनमंत्र्यांनी या संदर्भात सायंकाळी व्टिटरद्वारे मोरजी येथील घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. मोरजी येथे ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पार्ट्या चालतात तो परिसर हा पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित परिसर म्हणून तसेच संवेदनशील परिसर म्हणून जाहीर केलेला आहे. असे असताना देखील त्या ठिकाणी पार्टी चालते, एवढेच नाही तर गुऊवारी रात्री देखील नियमाचे उल्लंघन कऊन पार्टी आयोजित करण्यात आली. आपण या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे. वन्य प्राणी कायद्यांतर्गत संबंधितांविऊद्ध कडक कारवाई वन अधिकाऱ्यांनी करावी यासाठीचे आदेश आपण जारी केल्याचे विश्वजित राणे म्हणाले. असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी मोरजी येथील कासव संवर्धन परिसरात कोणत्याही हालचाली होऊ नयेत, तेथील वातावरण बिघडून जाऊ नये या करीता जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली जाईल. ते एक जबाबदार अधिकारी म्हणून नव्या आदेशात नमूद केले जाणार आहे. मोरजीच्या या परिसरात यानंतर पुन्हा पार्टी झाली तर हा प्रकार आपण मुळीच खपवून घेणार नाही. अशा पार्ट्यांना मुळीच परवानगी दिली जाऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी, असा आदेशही मंत्री विश्वजित राणे यांनी दिला आहे.