कागल / प्रतिनिधी
कागल- मुरगुड राज्यमार्गावर मिनी ट्रॅव्हल्स- इनोव्हा कार व दुचाकी यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. नवनाथ दत्तात्रय धनगर ( रा . एकोंडी ता . कागल ) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. या अपघातात आणखीन दोन महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाल्याचे समजते.