अद्भूत ऑटोमेशन असल्याची लोकांची प्रतिक्रिया
शेजारी देश पाकिस्तानातून अनेकदा सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. पाकिस्तानात राजकीय विरोध हा नित्यनेमाचाच प्रकार ठरला आहे. शाहबाज शरीफ सरकारच्या विरोधात पाकिस्तानात सातत्याने निदर्शने होत आहेत. अलिकडेच निदर्शनांमध्ये स्वतःचा भार कमी करण्यासाठी निदर्शकांनी ‘चप्पल मार मशीन’चा वापर केला आहे. या मशीनला लोकांनी ‘ऑटोमॅटिक लानत मशीन’ नाव दिले आहे. आता याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा मजेशीर व्हिडिओ अनेकांनी ट्विटरवर शेअर केला आहे. पत्रकार आदित्य राज कौल यांनी हा व्हिडिओ शेअर करत ‘इंजिनियरिंगचा असा चमत्कार केवळ पाकिस्तानीच करू शकतात’ असे नमूद केले आहे. व्हायरल व्हिडिओत एका इसामाला मशीनचे हँडल खेचताना पाहिले जाऊ शकते. हँडल खेचताच पोस्टवरील चेहऱयावर चप्पलेचा मार बसतो. या व्हिडिओला आतापर्यंत 3 लाख ह्यूज मिळाले आहेत. तर या व्हिडिओला 2 हजारवेळा रीट्विट तर 11 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
या व्हिडिओला पाहिल्यावर लोकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. खरोखरच ही उत्तम कल्पना असल्याचे एका युजरने म्हटले आहे. तर दुसऱया युजरने ‘अद्भूत ऑटोमेशन’ कोण म्हणते की पाकिस्तान तांत्रिक दृष्टय़ा विकसित देश नाही’ अशी कॉमेंट केली आहे. ‘ऑटोमॅटिक लानत मशीन…इनोव्हेशन पुढील स्तराचे आहे’ असे एका व्यक्तीने म्हटले आहे. ‘पाकिस्तानकडून मशीन लर्निंगची ही नवी पद्धत आहे’ असे एका युजरने नमूद केले आहे.