Tarun Bharat

लडाखमध्ये ‘डार्क स्काय रिझर्व्ह’ची निर्मिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हिमालयातील लडाख या प्रदेशात 22 किमी त्रिज्या असणाऱया वैशिष्टय़पूर्ण डार्क स्काय रिझर्व्हची निर्मिती करण्यात येत आहे. या संरक्षित स्थानामध्ये अवकाशाचे अवलोकन करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे अवकाश दर्शन पर्यटनाला (ऍस्ट्रो टूरिझम) प्रोत्साहन मिळणार आहे.

सध्या रात्रीच्या वेळी शहरांपासून खेडय़ांपर्यंत सर्वत्र कृत्रीम प्रकाश पाडला जातो. अशा प्रकाशात अवकाश दर्शन व्यवस्थीत होत नाही. त्यामुळे अवकाशाचा अभ्यास करण्यासाठी तसेच दुर्बीणीतून अवकाशस्थ वस्तूंचे अवलोकन करण्यासाठी डार्क स्काय झोनची निर्मिती करण्यात येते. या संरक्षित क्षेत्रामध्ये कृत्रीम प्रकाश पाडण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली असून लडाखमधील डार्क स्काय रिझर्व्ह हे याच कारणासाठी निर्माण करण्यात येत आहे. येथे भारतातील आणि जगातील अवकाश संशोधक त्यांचे संशोधन करु शकणार आहेत. हा प्रकल्प लडाख ऍटोनॉमस हिल डेव्हलपमेंट परिषद, इंडियन इंस्टिटय़ूट ऑफ ऍस्ट्रोफिजिक्स आणि अन्य संस्थांनी एकत्रीतरित्या उभारण्यास प्रारंभ केला आहे.

Related Stories

केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचे संकेतस्थळ हॅक

Patil_p

कोरोना संकटामुळे बेरोजगारी वाढली

Patil_p

‘या’ राज्यात आजपासून सुरू होणार शाळा

Tousif Mujawar

उद्यापासून 75 दिवस बुस्टर डोस मोफत

Patil_p

‘यास’ची तीव्रता वाढली; ‘या’ राज्यांना बसणार फटका

datta jadhav

4 नौसैनिकांचे मृतदेह हस्तगत, दोघांचा शोध सुरू

Patil_p