Tarun Bharat

प्रयोगशाळेत होणार अवयवांची निर्मिती

कृत्रिम अवयवांवर होणार लसींचे वैद्यकीय परीक्षण : वैद्यकीय परीक्षणासाठी नव्या कायद्याचा मसुदा तयार

औषधे आणि लसींच्या वैद्यकीय परीक्षणासाठी देशात मोठा पुढाकार घेतला जात आहे. प्राण्यांऐवजी आता प्रयोगशाळेत मानवी पेशींद्वारे विकसित अवयवांवर वैद्यकीय परीक्षण केले जाणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये भारत सरकारकडून यासंबंधी आवश्यक नियम-कायदे आणि अटींचा विस्तृत अहवाल जारी केला जाणार आहे. याकरता न्यू ड्रग्स अँड क्लीनिकल ट्रायल रुल्स-2019 मध्ये बदल केला जाणार आहे. याकरता मसुदा तयार करण्यात आला आहे.

कृत्रिम मानवी अवयवांवर वैद्यकीय परीक्षण होणारा भारत हा अमेरिकेनंतर दुसरा देश ठरणार असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे. अशाप्रकारच्या परीक्षणात पैसे अन् वेळेची बचत होणार आहे. औषधे आणि लसींची प्रभावोत्पादकताही वाढेल. सध्या परीक्षणात अपयशाचे प्रमाण 80-90 टक्के आहे. नव्या व्यवस्थेमुळे यशाचा दर 80-90 टक्के होऊ शकतो.

कृत्रिम अवयवांची निर्मिती

प्रारंभिक टप्प्यात रुग्णालयात दाखल अन् शस्त्रक्रिया केल्या जाणाऱया रुग्णांचा टय़ूमर काढल्यावर त्याच पेशींद्वारे प्रयोगशाळेत मानवी अवयव विकसित केले जाणार आहेत. याच अवयवांवर औषधे किंवा लसीचे वैद्यकीय परीक्षण होणार आहे. परंतु छोटय़ा प्राण्यांवर वैद्यकीय परीक्षणाचा पर्याय औषध अन् लस निर्मिती कंपन्यांकडे उपलब्ध असणार आहे.

रुग्णालयांशी भागीदारी

पहिल्या टप्प्यात मानवी पेशींद्वारे हृदय, यकृत, मूत्रपिंड, मेंदू अणि व्हेस्कुलर सिस्टीम प्रयोगशाळेत तयार करण्यात येईल. नियम लागू करण्यात आल्यावर बायो-फार्मा कंपन्यांना रुग्णालयांशी टायअप करण्याचा अधिकार असेल. औषध कंपन्या रुग्णालयांकडून पेशी मिळवत प्रयोगशाळेत अवयव विकसित करू शकतील.

Related Stories

प्राण्यांशी बोलून मोठी कमाई

Patil_p

डुकरासारखे तोंड असणारा शार्क जाळय़ात

Patil_p

मंकीपॉक्सचा आजार; नेमकी काय आहे परिस्थिती…

Rahul Gadkar

रस्ता ओलांडण्यास मदत करणारा श्वान

Patil_p

नव्याने शोध लागलेल्या कोळ्याच्या प्रजातीला 26/11 हल्ल्यातील शहीद तुकाराम ओंबळे यांचे नाव

Tousif Mujawar

भारतीय नवजात तुलनेत कमी रडतात

Amit Kulkarni