Tarun Bharat

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा डिस्ने स्टारबरोबर करार

Advertisements

वृत्तसंस्था/ मेलबर्न

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या भारतात होणाऱया सामन्यांच्या प्रक्षेपणासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रविवारी डिस्ने स्टार या वाहिनीबरोबर सात वर्षांचा करार केला आहे. डिस्ने स्टार ही क्रीडावाहिनी जगातील मोठे मार्केट मिळवून देणारी म्हणून ओळखली जाते. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि डिस्ने स्टार यांच्यातील झालेल्या कराराला 2023-24 पासून प्रारंभ होईल. डिस्ने स्टार वाहिनीतर्फे ऑस्ट्रेलियाचे सर्व आंतरराष्ट्रीय सामने तसेच केएफसी बिग बॅश लिग त्याचप्रमाणे वेबर बिग बॅश लिग, भारतात होणाऱया सामन्यांचे प्रक्षेपण केले जाणार आहे. 2017-18 पासून सोनी वाहिनीकडे ऑस्ट्रेलियन संघाचे प्रक्षेपण हक्क होते. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हे हक्क डिस्ने स्टारकडे सोपविले आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि भारतातील बोर्ड कमर्शियल पार्टनर यांना या वाहिनीचा अधिक लाभ मिळेल. डिस्ने स्टार वाहिनीने अलीकडेच आयपीएल स्पर्धेसाठी 2023 ते 27 या दरम्यान टीव्ही प्रक्षेपण हक्क मिळविले आहेत.

Related Stories

भारत-पाक, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामने ‘हाऊसफुल्ल’

Patil_p

सायकलिंगमध्ये पूजाचा सुवर्ण चौकार

Patil_p

धावपटू मिल्खा सिंग पुन्हा आयसीयूमध्ये दाखल

Patil_p

सूर्यकुमार यादव आयपीएल स्पर्धेतून बाहेर

Patil_p

माजी आंतरराष्ट्रीय वॉटरपोलोपटू अभय दाढे यांचे निधन

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा अफगाणविरुद्ध विजयासाठी संघर्ष

Patil_p
error: Content is protected !!