25, 26 रोजी आयोजन : राज्यभरातील संघांचा समावेश
बेळगाव : बेळगाव डिस्ट्रीक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्यावतीने 25 व 26 मार्च रोजी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युनियन जिमखाना येथे ‘केएसटीपीए होंबळ कप 2023’ क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील 12 जिल्ह्यांचे संघ सहभागी होणार असून, विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष जितेश कब्बूर यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दि. 25 रोजी सकाळी 9 वा. क्रेकेट स्पर्धेचे उद्घाटन अॅड. मुरगेंद्रगौडा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्य जीएसटी विभागाचे सहआयुक्त यास्मिनबेगम वालीकर, रमेश बाबू एम.जे., संघटनेचे राज्याध्यक्ष नंजूनंदाप्रसाद उपस्थित राहणार आहेत. तर 26 रोजी सायं. 5 वा. मार्कंडेय साखर कारखान्यांचे चेअरमन अविनाश पोतदार यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. बेळगावसह दावणगेरी, विजापूर, गुलबर्गा, गदग, तूमकूर, हुबळी येथील संघ सहभागी होतील. कर सल्लागार हा पेशा तसा मानसिक ताण असणारा असल्यामुळे विरंगुळा मिळावा, या उद्देशाने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल क्रिकेट स्पर्धेसह इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे महांतेश द•ाrगुंडी यांनी सांगितले. यावेळी भरतेश मुरगुंडे, बसवराज हनगुंडी यासह इतर सदस्य उपस्थित होते.