Tarun Bharat

अपहार प्रकरणी सहकार विभागाच्या लेखापरीक्षकांवर गुन्हा

पुणे / वार्ताहर :

पुण्यातील एका सोसायटीचे फेरलेखापरीक्षण करताना सहकार विभागातील लेखापरीक्षक आणि प्रशासक यांनी दोन लाख दोन हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी या दोघांवर मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेखापरीक्षक किरण चौधरी आणि प्रशासक हरुन सय्यद अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे.

याप्रकरणी सहकार विभागाचे वर्ग एकचे अधिकारी अपर लेखा परीक्षक महेश चंद्रकांत जाधव (वय 55) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार हे अप्पर लेखापरीक्षण श्रेणी सहकारी संस्था,पुणे येथे विशेष लेखापरीक्षक पदावर काम करत आहे. 16/6/2017 रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने यल्लो ब्लॉसम सहोरी गृहरचना संस्था, बी.टी.कवडे रोड,घोरपडी, पुणे या संस्थेचे 2011-12 या कालावधीचे फेरलेखापरीक्षण करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. याबाबत तक्रारदार यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,पुणे यांचे फेरलेखापरीक्षण पूर्ण करुन वैधानिक लेखापरीक्षक किरण चौधरी व प्रशासक हरुन सय्यद यांनी दोन लाख दोन हजार रुपये रक्कमेचा अपहार केल्याचा फेरलेखापरीक्षण अहवाल 27/9/2022 रोजी उपलब्ध झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहे.

अधिक वाचा : शिंदे गटाचे 3 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट

Related Stories

लोकनेते साखर कारखाना येथे बायोगॅस टाकी कोसळून दोघांचा मृत्यू

Archana Banage

आनंदसरी महाराष्ट्रात…

Patil_p

निमर्नुष्य पंढरीत आषाढीचा सोहळा

Archana Banage

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 3 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण

Archana Banage

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 4,654 नवे रुग्ण ; 170 मृत्यू

Tousif Mujawar

औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 15 हजारच्या उंबरठ्यावर

Tousif Mujawar