Tarun Bharat

युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर गुन्हा

प्रतिनिधी/ बेळगाव

फेसबुकवर महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणारे युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर येथील माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभेच्छा देण्यासाठी टाकलेली पोस्ट काढण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला. त्यांनी नकार देताच त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

माहिती-तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 66 व भा.दं.वि. 153(बी) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्याने दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली असून एफआयआर दाखल करण्यापूर्वी शुभम शेळके यांना माळमारुती पोलीस स्थानकात बोलावून शुभेच्छा देणारी पोस्ट काढण्यास सांगितली. आपण महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात आक्षेपार्ह असे काहीच नाही, असे शुभम शेळके यांनी पोलिसांना पटवून देण्याचा प्रयत्न केला व ही पोस्ट काढण्यास नकार दिला. त्यावेळी त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

मंदिरे सर्वांना ऊर्जा देणारी शक्तीपीठे

Omkar B

मुलांसाठी पहिला बालक्लब आता बालसभा

Amit Kulkarni

लीजवाढीसाठी अर्ज न केल्यास करार रद्द

Amit Kulkarni

सरस्वती वाचनालय, स्वरमल्हारतर्फे 24 रोजी गुरुपौर्णिमा उत्सव

Amit Kulkarni

चित्रकार जीव ओतून कलाकृती जीवंत करतो

Amit Kulkarni

संततधारमुळे साऱयांचीच उडाली तारांबळ

Amit Kulkarni