न्यायदंडाधिकानेच दाखल केली फोंडा पोलीस स्थानकात तक्रार
प्रतिनिधी /फोंडा
फोंडय़ातील एका विशेष न्यायदंडाधिकाऱयाला त्याच्यात कार्यालयात शिवीगाळ केल्याप्रकरणी सपना पार्क बेतोडा येथील एका दांपत्याविरोधात फोंडा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित दांपत्याला वाहतूक नियमांचे उल्लघन केल्याबद्दल त्याच्या गुन्हयासंदर्भात दंड वसुल करण्यासंबंधी न्यायालयात हजर झाले असता ही घटना घडली होती.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फोंडा येथील विशेष न्यायदंडाधिकारी यांनी दांपत्याविरोधात फोंडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे. संशयिताने विशेष न्यायदंडाधिकाऱयाला व तिच्या कर्मचाऱयाला शिवीगाळ तसेच कार्यालयातील टेबलावर दंड थोपडण्याचे कृत्य केल्याचे तक्रारीत म्हटलेले आहे. याप्रकरणी विशेष न्यायदंडाधिकाऱयाला कायदेशीर कर्तव्य बजावताना संशयिताने अडथळा आणल्याचा टपका ठेवण्यात आला आहे. फोंडा पोलिसांनी संशयित दांपत्याविरोधात भा.दं.सं. 353 व 504 कलमाखाली गुन्हा नेंदविण्यात आला आहे.
संशयितानी फेसबुक माध्यमातून माहिती जनतेपर्यंत पोचविली
दरम्यान आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात दांपत्यानी फेसबुकच्या माध्यमातून सविस्तर माहिती जनतेपर्यंत पोचविलेली आहे. या व्हीडीओमध्ये तीने सन 2018 साली वाहतूक नियमाचे उल्लघन केल्याप्रकरणी न्यायालयाने नोटीस बजावण्यात आली होती. सदर नोटीस सन 2019 साली पोचती केली होती मात्र सदर नोटीस दांपत्याला कधी मिळालीच नाही, त्या नोटीसीवर सदर इसमाला ती पोचली नसल्याची (अनडिलीवर्ड) असा शेरा मारलेला आहे. याबद्दल दांपत्यांनी विचारपूस केल्याप्रकरणी दोघांविरोधात तक्रार नोंदविण्याची भीती न्यायदंडाधिकाऱयांनी दाखविण्यात आल्याची माहिती फेसबुकवर प्रसारीत केलेल्या व्हीडीओत म्हटले आहे. याप्रकरणी नोटीस पोचती करण्यास पोलीसांचा गलथानपणा की अन्य कुठल्या कारणाने नोटीस मिळाली नाही याची कसून चौकशी फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर करीत आहे.