Tarun Bharat

गर्भपात विरोधी निर्णयावर टीका

Advertisements

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकताच गर्भपात करून घेण्याच्या अधिकारावर नियंत्रण आणणारा निर्णय दिला आहे. यामुळे यापुढे अमेरिकेतील महिलांना त्यांच्या इच्छेनुसार गर्भपात करता येणे अशक्य होणार आहे. या निर्णयावर संयुक्त राष्ट्र संघाने नाराजी व्यक्त केली आहे. महिलांचा महत्त्वाचा अधिकार त्यांना नाकारण्यात आली असल्याची प्रतिक्रिया या जागतिक संस्थेने व्यक्त केली आहे.

महिलांना गर्भपात करून घेण्याचा अधिकार अनिर्बंधपणे उपयोगात आणल्यास त्यातून लोकसंख्या घट होण्याचा धोका संभवतो. सातत्याने अशी घट होत गेल्यास असा समाज अस्तंगत होण्याचीही शक्यता आहे, असे काही तज्ञांचे मत आहे. मानवाच्या पुढच्या पिढय़ांच्या अस्तित्वासाठी गर्भपाताच्या अधिकारावर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. या निर्णयाला विरोध करणाऱयांचीही संख्या कमी नाही. तथापि निर्णयाच्या समर्थनार्थही मोठा वर्ग इंटरनेटवरून सक्रिय आहे.

Related Stories

पाक : रुग्ण वाढले

Omkar B

रशियाची युक्रेनमधील दोन बंडखोर प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता

Abhijeet Shinde

नव्या नकाशाला मान्यता देण्यासाठी नेपाळकडून घटनादुरुस्ती

datta jadhav

अपुरी व्यवस्था

Omkar B

अमेरिकेत : तिसरी लाट

Patil_p

70 टक्के लोकांनी मास्क वापरल्यास महामारी नियंत्रित

Omkar B
error: Content is protected !!