Tarun Bharat

क्रोएशिया सर्वप्रथम उपांत्य फेरीत

पेनल्टी शूटआऊमध्ये ब्राझीलवर 4-2 गोलफरकाने मात, गोलरक्षक लिवाकोविक पुन्हा ठरला हिरो

वृत्तसंस्था/ अल रय्यान, कतार

संभाव्य विजेत्या मानल्या जाणाऱया ब्राझीलला गतउपविजेत्या क्रोएशियाने पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशा गोलफरकाने पराभव करून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सर्वप्रथम स्थान मिळविले. क्रोएशियाचा गोलरक्षक डॉमिनिक लिवाकोविक पुन्हा एकदा त्यांचा हिरो ठरला. त्याने एक पेनल्टी अडवली तर निर्धारित वेळेत ब्राझीलचे काही प्रयत्न फोल ठरविले होते.

पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाचा गोलरक्षक लिवाकोविकने ब्राझीलच्या रॉड्रीगोचा फटका अडवला तर नंतर माक्व्&िान्होचा फटका बारला लागल्याने वाया गेला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी गोलशून्य बरोबरी साधली होती. जादा वेळेत नेमारने गोल नोंदवून ब्राझीलला आघाडी मिळवून दिली. पण जादा वेळेच्या दुसऱया सत्रात 116 व्या मिनिटाला ब्रुनो पेटकोविकने क्रोएशियाला बरोबरी साधून दिली. नेमारने ब्राझीलचे माजी महान खेळाडू पेले यांच्या विक्रमाशी बरोबरी केली असून दोघांचेही 77 गोल झाले आहेत. क्रोएशियाची उपांत्य लढत अर्जेन्टिना किंवा नेदरलँड्स यापैकी एका संघाविरुद्ध होईल. चार वर्षापूर्वी झालेल्या स्पर्धेत क्रोएशियाने अंतिम फेरी गाठली होती. पण अंतिम लढतीत त्यांना फ्रान्सकडून पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांचे जेतेपद हुकले होते. यावेळी पुन्हा एकदा त्यांना अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळाली आहे.

क्रोएशियाचे विश्वचषक स्पर्धेतील गेले सहापैकी पाच सामने जादा वेळेपर्यंत लांबले आहेत. याआधीच्या शेवटच्या सोळा फेरीतील लढतीत त्यांनी जपानला पेनल्टी शूटआऊमध्ये हरविले होते. या स्पर्धेच्या बाद फेरीतील गेल्या दहापैकी आठ सामन्यांत क्रोएशिया संघ यशस्वी ठरला आहे. ब्राझील संघ मात्र 1986 नंतर प्रथमच या स्पर्धेत पेनल्टी शूटआऊमध्ये पराभूत झाला आहे. यापूर्वी 2014 मध्ये ब्राझीलने उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर त्यांना या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारण्यात अपयशच आले आहे. 2014 मध्ये जर्मनीकडून त्यांना 1-7 असा नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला होता. याशिवाय 2002 नंतर प्रथमच या स्पर्धेच्या बाद फेरीत युरोपियन संघाला पराभूत करण्यासाठी ते प्रयत्न करीत होते. त्यावर्षी अंतिम फेरीत ब्राझीलने जर्मनीचा पराभव करून शेवटचे जेतेपद पटकावले होते.

पेनल्टी शूटआऊमध्ये निकोला व्लासिकने क्रोएशियाचा पहिला गोल नोंदवला तर ब्राझीलच्या रॉड्रीगोचा फटका गोलरक्षक लिवाकोविकने अडविल्याने वाया गेला. लोवरो माजेरने क्रोएशियाच्या दुसऱया पेनल्टीवर गोल नोंदवत 2-0 अशी आघाडी केली. ब्राझीलच्या दुसऱया पेनल्टीवर कॅसेमिरोने अचूक गोल नोंदवून ही आघाडी 1-2 अशी कमी केली. तिसऱया पेनल्टीवर लुका मोड्रिकने अचूक फटका मारत क्रोएशियाची आघाडी 3-1 अशी केली तर ब्राझीलच्या पेड्रोने गोल नोंदवून ही आघाडी पुन्हा 2-3 अशी कमी केली. ऑर्सिकने चौथ्या पेनल्टीवर क्रोएशियाची आघाडी 4-2 अशी केली. पण माक्व्&िान्होने मारलेला फटका उजव्या बारला लागून परतल्याने क्रोएशियाला 4-2 अशी आघाडी मिळाल्यानंतर संघाने व त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड जल्लोष सुरू केला. ब्राझीलच्या गोटात मात्र आव्हान समाप्त झाल्याने निराशेचे वातारवरण पसरले होते.

Related Stories

जूनमध्ये भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱयावर

Patil_p

मेक्सिकोला नमवत ब्राझील अंतिम फेरीत

Patil_p

हरियाणात दोन आयटीएफ टेनिस स्पर्धांचे आयोजन

Patil_p

कोलकाता नाईट रायडर्सचा दणदणीत विजय

Patil_p

अमेरिकेची कोको गॉफ उपांत्य फेरीत

Patil_p

आयर्लंड-नामिबिया आज महत्त्वाची लढत

Amit Kulkarni