Tarun Bharat

सित्सिपसला हरवून क्रोएशियाचा कोरिक अजिंक्य

वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी

एटीपी टूरवरील रविवारी येथे झालेल्या सिनसिनॅटी मास्टर्स पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत क्रोएशियाच्या बोर्ना कोरिकने ग्रीसच्या सित्सिपसचा पराभव करत एकेरीचे अजिंक्मयपद पटकाविले.

एटीपीच्या क्रमवारीत 152 व्या स्थानावर असलेल्या कोरिकने अंतिम सामन्यात ग्रीसच्या सित्सिपसचा 7-6 (7-2), 6-2 असा पराभव केला. या सामन्यात कोरिकचा खेळ दर्जेदार आणि अचूक झाल्याने आपल्याला पराभव पत्करावा लागला, अशी प्रतिक्रिया सित्सिपसने या सामन्यानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केली. चार वर्षांपूर्वी शांघाय येथे झालेल्या मास्टर्स टेनिस स्पर्धेत कोरिकला अंतिम सामन्यात सर्बियाच्या जोकोविचकडून पराभव पत्करावा लागला होता. कोरिक आणि सित्सिपस यांच्यात आतापर्यंत तीन सामने झाले असून त्यापैकी दोन सामने कोरिकने तर एक सामना सित्सिपसने जिंकला आहे. 29 ऑगस्टपासून सुरू होणाऱया अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी कोरिक आता सज्ज झाला आहे.

Related Stories

साईने स्वीकारला जॉन यांचा राजीनामा

Patil_p

बेलारुसची साबालेन्का उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

भारत फिफाच्या-ई नेशन्स चषक स्पर्धेसाठी पात्र

Patil_p

तालिबानकडून अफगाण क्रिकेटच्या कार्यकारी संचालकाची हकालपट्टी

Patil_p

बांगलादेश टी-20 संघात दोन नवे चेहरे

Patil_p

यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाला धोंडशिरेची दुखापत

Patil_p