Tarun Bharat

सांकवाळच्या पडिक शेतजमिनीत मगरीचा वावर

नागरिकांत कुतुहल व भीतीही

वार्ताहर /झुआरीनगर

गेल्या कांही दिवसांपासून सांकवाळच्या श्री शांतादुर्गा देवालयामागील पडिक शेतजमिनीत एक मोठे मगर वावरत असल्याने स्थानिकांत हा विषय चर्चेचा बनलेला आहे व त्याचबरोबर भीतीही पसरलेली आहे.

मागील कित्येक वर्षापासून सांकवाळची ही शेतजमीन पडिक आहे. या शेतजमिनीच्यामधून एक मोठा चर आहे. समुद्रातील पाणी चरातून जाते. याच चरात या मगराचे वास्तव्य असल्याचे बोलले जात आहे तसेच इथे हे एकच मगर नसून आणखीन मगरी असण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस एक मगर चराटय़ावर येऊन चिखलात विसावलेले दिसत आहे. सांकवाळ भागातील या शेतजमिनीत या अगोदर कधीच असे मगर दिसले नव्हते म्हणून हा विषय सध्या गावात चर्चेचा बनलेला आहे व त्याचबरोबर नागरिकांच्या मनात भीतीही निर्माण झालेली आहे. कारण सध्या पावसाचे दिवस असल्याने गावातील अनेकजण गळ टाकून मासे पकडण्यासाठी जातात. अशावेळी त्यांना या मगरीचा धोका संभवतो. या समस्येविषयी वनविभागाला कळविण्यात आलेले आहे. परंतु ही शेतजमिन खूप मोठी असल्याने या मगराला पकडणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या मगरीचा फोटो आपल्या मोबाईलच्या कॅमेऱयात टिपण्यासाठी लोकांची बरीच गर्दी होताना दिसते.

Related Stories

पारंपरिक रेती व्यावसायिकांना परवाने मिळावेत यासाठी प्रयत्न

Amit Kulkarni

उमेश तळवणेकर यांचा राजीनामा

Patil_p

हसापूर येथे शिवजन्मोत्सव उत्साहात

Amit Kulkarni

माजी मंत्री माँत क्रूझ यांचा दृष्टिकोन पुढे नेणार

Amit Kulkarni

करासवाडा येथे वीज सबस्टेशनचे उद्घाटन

Omkar B

मांदे मनोरंजन सिटीला प्राणपणाने विरोध करू : विजय सरदेसाई

Amit Kulkarni