नवी दिल्ली
फॅनसह विविध इलेक्ट्रॉनिक उत्पादने बनविणारी कंपनी क्रॉम्प्टन आता किचन अप्लायन्सेसच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकण्याचा विचार करते आहे. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील आपल्या दीर्घकालीन अनुभवाच्या जोरावर किचन अप्लायन्सेसच्या क्षेत्रात उतरण्याची तयारी कंपनीने केली आहे.
पुढील तीन वर्षांच्या काळामध्ये किचन अप्लायन्सेसच्या क्षेत्रामध्ये 10 टक्के इतका वाटा काबीज करण्याचा इरादा कंपनीने व्यक्त केला आहे. इलेक्ट्रिकल आणि लायटिंगच्या क्षेत्रामध्ये सदरची कंपनी गेली कित्येक वर्षे कार्यरत आहे.
यांच्या पंख्यांची लोकप्रियता सर्वदूर पसरलेली आहे. पंख्यांची बाजारपेठ पाहता यामध्ये 20 टक्के वाटय़ासह क्रॉम्प्टन आघाडीवरची कंपनी ठरली आहे. लायटिंगच्या बाजारपेठेतही कंपनीचा 10 टक्के इतका वाटा राहिला आहे.