Tarun Bharat

खंडेनवमीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

Advertisements

नवीन वस्तू खरेदीला नागरिकांची पसंती, झेंडूच्या फुलांना मागणी अधिक

प्रतिनिधी /बेळगाव

खंडेनवमी आणि विजयादशमीनिमित्त सोमवारी बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. इलेक्ट्रॉनिक शोरूम, कपडय़ांची दुकाने आणि मिठाईच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून आली. विशेषतः नवीन वस्तू खरेदी करण्याबरोबरच इतर वस्तूंनादेखील मागणी वाढली होती. किराणा वस्तू, पूजेचे साहित्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू यासह इतर साहित्यांची खरेदी नागरिक करत होते.

तब्बल दोन वर्षांनी यंदा नवरात्री आणि दसरा निर्बंधमुक्त होत आहे. त्यामुळे भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱया दसरा सणासाठी नवीन वस्तूंची खरेदी अधिक केली जाते. त्यामुळे कपडय़ांबरोबर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि वाहनांना अधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या दोन वर्षांनंतर सण-उत्सवांसाठी बाजारपेठ बहरताना दिसत आहे.

खंडेनवमीच्या पूर्वसंध्येला बाजारात फुले, हार, आंबोती व केळीची पाने, नारळ, विडा, अगरबत्ती, लिंबू, कापूर, धूप आदी पूजा साहित्याला मागणी वाढली होती. दसऱयादिवशी नवीन वाहन तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे वाहनांच्या बुकिंगसाठी शोरूममध्ये वर्दळ पहायला मिळाली. दसऱयाला झेंडूच्या फुलांना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. त्या अनुषंगाने झेंडूच्या फुलांची आवक वाढली होती. शिवाय खंडेनवमीनिमित्त विविध फुलांची खरेदीही अधिक झालेली दिसून आली. बाजारात रंगीबेरंगी विविध जातीच्या फुलांच्या छटा पहायला मिळत आहेत. मंगळवारी फुलांच्या मागणीत आणखी वाढ होईल, अशी आशा किरकोळ फूल विपेत्यांना आहे.

झेंडूच्या फुलांची आवक

खंडेनवमीनिमित्त बाजारात विविध पूजा साहित्याबरोबरच फुलांची मागणी वाढली होती. विशेषतः किरकोळ विपेत्यांकडे झेंडूच्या फुलांची आवक दिसून आली. त्याचबरोबर मागणीदेखील वाढली होती. खंडेनवमीनिमित्त शस्त्रपूजन केले जाते. यासाठी झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट केली जाते. त्यामुळे सोमवारी अष्टमीच्या दिवशी झेंडूच्या फुलांना मागणी वाढली होती.

खंडेनवमीसाठी शहरात उसाची आवक

खंडेनवमीला उसाची मांडणी करून पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. या पार्श्वभूमीवर बाजारात उसाची आवक वाढली आहे. काकतीवेस रोड, यंदे खूट, सम्राट अशोक चौक यासह बाजारात उसाची विक्री सुरू होती. साधारण पाच ऊस 70 रुपयाला विकले जात होते.

दसरा, दिवाळीला मोठय़ा प्रमाणात पूजेसाठी उसाची विक्री केली जाते. मंगळवारी खंडेनवमी असल्याने बाजारात विविध ठिकाणी उसाची विक्री झाली. मुतगा, सांबरा व बाळेकुंद्री भागातून विक्रीसाठी ऊस बाजारात दाखल झाले होते. घरोघरी यंत्रांबरोबर वाहनांनादेखील ऊस बांधले जातात. त्यामुळे वाहनधारकांकडून उसाची मागणी वाढली होती. बाजारपेठेबरोबर शहराबाहेरील रस्त्यांवर उसाची अधिक विक्री झाली.

Related Stories

के. आर. शेट्टी चषक क्रिकेट : साई स्पोर्ट्स, केआर शेट्टी किंग्ज संघ विजयी

Amit Kulkarni

बेळगाव बार असोसिएशनसाठी 2 हजार 75 मतदार

Amit Kulkarni

उचगाव विभागीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

Amit Kulkarni

प. पू. पंन्यास भद्रानन्दविजयजी महाराज यांचे महानिर्वाण

Patil_p

वेणुग्राम महिला सायकलिंग रॅली उत्साहात

Amit Kulkarni

शहराला सुरळीत पाणीपुरवठा करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!