Tarun Bharat

दसऱयाच्या खरेदीसाठी बाजारात वर्दळ

Advertisements

विविध प्रकारच्या नवीन वस्तू खरेदी करण्यास पसंती : फुलांची आवकही वाढली

प्रतिनिधी /बेळगाव

विजयादशमी दसरा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने दसऱयाच्या खरेदीसाठी बाजारात नागरिकांची वर्दळ वाढू लागली आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने आबालवृद्धांसह नागरिकांची बाजारात रेलचेल पाहायला मिळाली. विशेषतः नवीन वस्तू खरेदीकडे नागरिकांची पसंती पाहायला मिळाली.

साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱया दसरा सणासाठी नवीन वस्तूची खरेदी केली जाते. त्यामुळे कपडय़ांबरोबर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर वस्तूंनादेखील मागणी वाढली होती. याबरोबर वेगवेगळय़ा फुलांबरोबर झेंडूच्या फुलांची आवक वाढली होती. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत सण-उत्सवांवर मर्यादा आल्या होत्या. मात्र, यंदा सणउत्सव मोठय़ा उत्साहात साजरे होत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतदेखील सणाच्या पार्श्वभूमीवर बहर येताना दिसत आहे. दसऱयादिवशी नवीन वस्तूची खरेदी केली जाते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबर दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी बुकिंगदेखील केले जात आहे.

बाजारातील गणपत गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, पांगुळ गल्ली, मेणसे गल्ली, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली आदी भागात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. किराणा बाजाराबरोबर कपडे, नवीन वस्तू खरेदीकडे नागरिकांची पसंती असल्याचेही दिसत आहे. त्यामुळे दोन वर्षानंतर दसऱयासाठी यंदा उलाढालही वाढेल, अशी आशा विपेत्यांना आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे सण-उत्सव मर्यादित स्वरुपात झाले होते. त्यामुळे बाजारपेठेवर देखील मोठा परिणाम झाला होता. मात्र, यंदा विविध साहित्याने बाजारपेठ बहरताना दिसत आहे. तसेच खरेदीसाठीदेखील नागरिक बाहेर पडत आहेत.

रंगीबेरंगी फुले बाजारात दाखल

विजयादशमी दिवशी मोठय़ा प्रमाणात फुलांची खरेदी केली जाते. त्यामुळे बाजारात झेंडूसह इतर फुलांची आवक वाढताना दिसत आहे. त्याबरोबर रंगीबेरंगी फुलांच्या छटा बाजारात दाखल होताना दिसत आहेत. मंगळवारी दसऱयाच्या पूर्वसंध्येला फुलांची विक्री वाढेल, असा विश्वास फुलविपेत्यातून व्यक्त होत आहे.

Related Stories

आदर्श महिला मंडळातर्फे वर्धापन दिन-महिला दिन साजरा

Amit Kulkarni

भात पिक पाण्याखाली …शेतकरी चिंतेत

Patil_p

शहराच्या विविध भागात 14 रोजी वीजपुरवठा खंडित

Amit Kulkarni

जमखंडीत उद्यापासून दुपारनंतर सर्व व्यवहार बंद

Patil_p

आधारकार्ड नोंदणीसाठी नागरिकांची धावपळ

Amit Kulkarni

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी द्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!