Tarun Bharat

युवराज सलमान आता सौदीचे पंतप्रधान

Advertisements

बंधू खालिद बिन सलमान संरक्षणमंत्री

वृत्तसंस्था/ रियाध

सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअजीज यांनी एक आदेश काढत स्वतःचा ज्येष्ठ पुत्र आणि युवराज 34 वर्षीय मोहम्मद बिन सलमान यांना देशाचा पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याची घोषणा केली आहे. तर कनिष्ठ पुत्र राजपुत्र खालिद बिन सलमान यांची संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  याचबरोबर राजपुत्र तुर्की बिन मोहम्मद बिन फहद बिन अब्दुल अजीज यांची राज्यमंत्री तर राजपुत्र अब्दुलअलीज बिन तुर्की बिन फैसल यांची क्रीडामंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे.

युवराज मोहम्मद बिन सलमान हे आतापर्यंत संरक्षणमंत्री म्हणून काम करत होते. त्यांचे बंधू राजपुत्र खालिद हे संरक्षण उपमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होते. तर विदेशमंत्री म्हणून पूर्वीप्रमाणेच राजपुत्र फैसल बिन फरहान अल सौद काम करणार आहेत. अर्थमंत्रिपदाची जबाबदारी मोहम्मद अल-जादान आणि गुंतवणूक मंत्री म्हणून खालिद अल-फलीह हे जबाबदारी सांभाळणार आहेत.

सौदी अरेबियाने संरक्षण क्षेत्रात स्वतःची आत्मनिर्भरता  2 टक्क्यांवरून वाढत 15 टक्के केली आहे. नव्या संरक्षणमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत नेण्याचे लक्ष्य असल्याची घोषणा युवराज सलमान यांनी केली आहे. तर सौदीचे राजे 86 वर्षीय सलमान बिन अब्दुलअजीज हे यापुढेही मंत्रिमंडळ बैठकांचे अध्यक्षत्व सांभाळणार आहेत.

युवराज सलमान यांनी एप्रिल 2016 मध्ये व्हिजन 2030 ची सुरुवात केली होती. सौदी अरेबियाला अरब तसेच इस्लामिक देशांचे नेतृत्व मिळवून देणे याचा उद्देश होता. याच्या अंतर्गत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात कच्च्या तेलावरील अर्थव्यवस्थेची निर्भरता कमी करण्याचा प्रयत्न, महिलांना वाहन चालविण्याचा अधिकार देणे, धार्मिक पदाधिकाऱयांच्या शक्तींवर अंकुश आणण्यासारखे मोठे निर्णय सामील आहेत.

Related Stories

पंजाबमध्ये मागील 24 तासात 8,014 नवे कोरोना रुग्ण; 182 मृत्यू

Tousif Mujawar

राजीव गांधींची पुण्यतिथी : राहुल गांधी, प्रियांका गांधींनी वाहिली श्रद्धांजली

Tousif Mujawar

दिवसातून दोनवेळा समुद्रात बुडणारे मंदिर

Patil_p

कमळ फुलले नितीश तरले

Patil_p

सार्वजनिक स्वच्छतागृहात कोरोनाचा धोका

Patil_p

किरकोळ महगाई दरात जानेवारीत वाढ

Patil_p
error: Content is protected !!