ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
उत्तर काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात रविवारी सकाळी सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. यावेळी सुरक्षा दलाकडून झालेल्या क्रॉस फायरिंगमध्ये एक नागरिक ठार झाला. शाहिद अहमद असे ठार झालेल्या नागरिकाचे नाव असून, तो खरपोरा नौपोरा अरवानी बिजबिहारा येथील रहिवाशी आहे. दरम्यान, सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घालून शोध मोहीम सुरू केली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये जमुरियातच्या ताकदीमुळे दहशतवादी संघटना चक्रावून गेल्या आहेत आणि त्या निराश आहेत. यामुळे तन्झीमध्ये जन्नतला जहनुम बनवण्याचा कट दहशतवादी आखत आहेत. लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी दहशतवादी सामान्य नागरिकांना लक्ष्य करीत आहेत. काश्मिरी पंडितांनंतर दहशतवाद्यांनी आता अल्पसंख्याक शीख समुदायाला लक्ष्य केले आहे.