आरोपी अलीला अटक : 16 वर्षीय मुलीवर केला गोळीबार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
झारखंडच्या दुमका येथे घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती करू पाहणाऱया दिल्लीतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. अलीने हिंदू समुदायाच्या मुलीला प्रेमाच्या जाळय़ात ओढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु यात अपयश आल्याने अलीने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. दुमका येथे शाहरुख नावाच्या युवकाने अल्पवयीन अंकिताला तिच्या घरातच पेटवून दिले होते. अंकिताच्या मृत्यूनंतर देशभरात खळबळ उडाली आहे.
दुमका येथील घटनेची चर्चा सुरू असतानाच दिल्लीत अली नावाच्या युवकाने शाळेतून घरी परतत असलेल्या मुलीवर मागून गोळीबार केला. या गोळीबारात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
जून महिन्यातच अली याच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. तेव्हा कॉन्स्टेबलने अली याला कठोर शब्दांत समजावून सोडून दिले होते असे मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे. अली हा पीडित मुलीच्या गल्लीतच वास्तव्यास आहे. अलीने 16 वर्षीय मुलीची छेडछाड सुरू केली होती. तसेच तो तिचा पाठलाग करत होता.