Tarun Bharat

क्रिप्टो करन्सी- डिजिटल चलन

क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली 40 कोटींचा गंडा, क्रिप्टो करन्सी, फसवणुकीचा पर्दाफाश, 2 जणांना अटक, 40 कोटींचा क्रिप्टो करन्सीचा घोटाळा, अशा अनेक बातम्या तुम्ही वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनलवर वाचल्या असणार. तसेच ह्यावषी बजेटमध्ये क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारावर 30 टक्के टॅक्स लागू केला आहे. आज क्रिप्टो करन्सीची किंमत जास्त असल्याने व सद्यस्थितीमध्ये कोणतेही नियम, कायदे अस्तित्वात नसल्याने क्रिप्टोकरन्सी हे एक मोठे फसवणुकीचे साधन तयार झाले आहे. त्याचा विस्तार इतका मोठा आहे की, या फसवणुकीला वेसण घालणे सरकारला किंवा पोलिसांना अवघड झाले आहे.

यासाठी मुळात डिजिटल करन्सी समजून घेणे आवश्यक आहे. एकदा हे समजले की त्यात गुंतवणूक करणे शक्मय आहे. अर्थात करावी की करू नये? हे ठरवता येईल. तसेच त्यामुळे होणाऱया फसवणुकीलाही आळा घालता येईल.

डिजिटल करन्सी ही डिजिटल मनी, इलेक्ट्रॉनिक मनी किंवा इलेक्ट्रॉनिक चलन म्हणजे जे संगणकाद्वारे मॅनेज करून व इंटरनेटद्वारे व्यवहार केले जातात. विविध देशांच्या सरकारांनी डिजिटल चलन, आभासी चलन, क्रिप्टो करन्सी, ई-मनी, नेटवर्क मनी, ई-कॅश आणि इतर प्रकारच्या डिजिटल चलनासाठी स्वतःची विशिष्ट व्याख्या लागू केली आहे.

डिजिटल करन्सीमध्ये तीन प्रक्रार आहेत. ज्यामध्ये क्रिप्टोकरन्सी, व्हर्च्युअल करन्सी (आभासी चलन) आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी यांचा समावेश होतो.

व्हर्च्युअल करन्सी (आभासी चलन) हा एक अनियमित, डिजिटल पैशाचा एक प्रकार आहे. ज्या लोकांनी हा तयार केला आहे, त्यांच्याद्वारे हा नियंत्रित केला जातो. तसेच विशिष्ट सोशल मीडिया ग्रुपमध्ये वापरला व स्वीकारला जातो.

एखाद्या देशाने सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) चलन तयार केले तर  त्याचे सरकारी चलनांप्रमाणेच ते कायदेशीर असेल व त्याची पेमेंट प्रक्रिया निर्धारित करून हा प्रकार स्वीकारला जातो. आज चीन, स्वीडन, बहमास, इस्टर्न कॅरेबियन, मार्शल आयलंड्स इ. देशांनी ह्याचा प्रयोग सुरू केला आहे.

क्रिप्टो करन्सी हा डिजिटल चलनाचा आणखी एक प्रकार आहे जो अतिशय प्रसिद्ध आहे व कोणालाही याची खरेदी विक्री किंवा व्यवहार करता येऊ शकतात. ह्यामध्ये संबंधित माहिती एन्क्रिप्टेड पद्धतीने विविध व वेगवेगळय़ा ठिकाणच्या डेटाबेसमध्ये (डिस्ट्रिब्युटेड) सुरक्षित ठेवली जाते. सध्या जगभरात 1500 पेक्षा जास्त क्रिप्टोकरन्सी वापरात आहेत. यापैकी बिटकॉईन, इथरियम, टिथर, युएसडी कॉईन, बिनान्स कॉईन, बिनान्स युएसडीटी, एक्सआरपी, कार्डानो, सोलाना, डोगे कॉईन, पोल्काडॉट हे सध्या चलनात आहेत.

सामान्य बँकिंग प्रक्रियेत, जे व्यवहार होतात त्याचा तपशील बँकांद्वारे तपासून त्याची पडताळणी करून केला जातो, तर क्रिप्टो करन्सीमध्ये केलेले व्यवहार-एक्सचेंज हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे अनेक देशांमध्ये पसरलेल्या डेटाबेसद्वारे व्हेरीफाय केले जाते. ब्लॉकचेन हा डिस्ट्रिब्युटेड लेजरसारखा असून यामध्ये सर्व एक्सचेंजशी संबंधित माहिती ब्लॉकच्या (डेटा) स्वरूपात एन्क्रिप्ट केलेली असते. ह्या ब्लॉकचेनमध्ये रेकॉर्ड केलेल्या प्रत्येक डेटा (ब्लॉक) ची स्वतःची विशिष्ट इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी असते, जी बदलली जाऊ शकत नाही. तसेच प्रत्येक ब्लॉकमध्ये मागील ब्लॉकची इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी देखील रेकॉर्ड केलेली असते ज्याचा उपयोग डेटाला एक श्रृंखलेमध्ये लिंक करून ठेवता येते. एकदा एखादा व्यवहार ब्लॉकचेनमध्ये नोंदवला गेला की तो हटवला जाऊ शकत नाही किंवा बदलताही येत नाही. तसेच ब्लॉकचेन एक्सचेंजमधील माहिती एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवण्याऐवजी हजारो (किंवा लाखो) संगणकांवर संरक्षित केली जात असते. कोणताही नवीन व्यवहार डेटाबेसशी जोडलेल्या सर्व संगणकांद्वारे (म्हणून ओळखले जातात) व्हेरीफाय केले जातात. ह्याला ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये नोड्स असे म्हणतात.

क्रिप्टोकरन्सीचे फायदे- क्रिप्टो करन्सीमधील व्यवहारांना बँकेच्या किंवा इतर कोणत्याही मध्यस्थांची आवश्यकता नसते. त्यामुळे या माध्यमातून अत्यंत कमी खर्चात व्यवहार करता येतात. तसेच क्रिप्टो करन्सीमध्ये व्यापार करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट स्वरुपाच्या ओळखपत्राची आवश्यकता नसल्यामुळे कोणतीही व्यक्ती या प्रणालीद्वारे आर्थिक क्षेत्राशी कनेक्ट होऊ शकते, व्यवहार करू शकते.

क्रिप्टो करन्सीचा दुसरा मोठा फायदा म्हणजे त्याची गोपनीयता. कोणत्याही स्वरुपाची ओळखपत्राची आवश्यकता नसतानासुद्धा जे लोक व्यवहार करतात त्यांची व त्यांच्या व्यवहारांची सर्व माहिती संरक्षित केली जात असते. क्रिप्टो करन्सी जगातील कोणत्याही देशात कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय वापरल्या जाऊ शकतात. मात्र क्रिप्टो करन्सीला कोणत्याही देशाने कायदेशीर चलन म्हणून मान्यता दिलेली नाही.

क्रिप्टो करन्सीचे तोटे- ह्याचे अनेक दुष्परिणाम किंवा तोटे आहेत. क्रिप्टो करन्सीला कोणत्याही देशाने किंवा त्यांच्या मध्यवर्ती बँकेद्वारे मान्यता व ओळख नसल्याने त्याचे मूल्य ठरवले जाऊ शकत नाही. ज्यामुळे त्याचे मूल्य अस्थिर असते. उदाहरणार्थ, डिसेंबर 2017 मध्ये बिटकॉइन ह्या क्रिप्टो करन्सीची किंमत 19 हजार युएस डॉलर्सपेक्षा जास्त होती, तर डिसेंबर 2018 मध्ये त्याची किंमत 3200 युएस डॉलर्सपर्यंत घसरली.

खासगी क्रिप्टो करन्सींवर सरकारच्या आर्थिक धोरणांचा परिणाम होत नाही. त्यामुळे क्रिप्टो करन्सीच्या वापराला प्रोत्साहन देणे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरू शकते. तसेच क्रिप्टो करन्सीच्या गोपनीयतेमुळे, दहशतवादी किंवा इतर बेकायदेशीर कामांमध्ये त्याचा वापर होऊ लागला आहे. भारतामध्ये क्रिप्टो करन्सीला परवानगी देण्यात यावी का, परवानगी दिल्यास त्यावर काय निर्बंध घालावेत? याबाबत अद्यापही केंद्र सरकारने पूर्ण निर्णय घेतला नाही आहे. अर्थात क्रिप्टो करन्सीला भारतामध्ये अधिकृत करण्याचा विचार केंद्र सरकारकडून सुरू आहे. ‘आरबीआय’कडून मात्र क्रिप्टो करन्सीच्या मान्यतेबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारताचे क्रिप्टो करन्सीबाबत काय धोरण असावे? हे ठरवण्यासाठी केंद्राकडून एक समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. भारतामध्ये क्रिप्टो करन्सीला पूर्णपणे बॅन करणे अशक्मय आहे. मात्र काही नियम घालणे शक्मय असल्याचा निर्वाळा या समितीने दिला आहे. ह्या समितीच्या रिपोर्टनुसार चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये क्रिप्टोशी संबंधित काही नवीन नियम भारतातही लागू करण्यात आले आहेत. यामध्ये क्रिप्टो उत्पन्नावर 30 टक्के कर आणि क्रिप्टो व्यवहारांमध्ये 1 टक्के टीडीएसची तरतूद समाविष्ट आहे. क्रिप्टो करन्सीच्या खरेदी-विक्रीसाठी भारतात सध्या 19 क्रिप्टो एक्स्चेंज आहेत. ज्यामध्ये WazirX, CoinDCX, CoinSwitch Kuber ह्यांना पसंती दिली जाते आहे.

– विनायक राजाध्यक्ष

Related Stories

सण निरागस हो

Patil_p

बीपीसीएल चार्जिंग केंद्रांसाठी गुंतवणार 200 कोटी

Patil_p

संन्यासाश्रम

Patil_p

‘आनंदा’ची गुढी!

Patil_p

पिकेल पण विकेल काय?

Patil_p

देव आहे का?

Patil_p